ETV Bharat / business

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या कायदेशीर अधिकारांना भारताने मदत करावी - चीन

author img

By

Published : Jun 30, 2020, 10:25 PM IST

केंद्र सरकारने टिकटॉक, युसी ब्राउझरसरह अनेक लोकप्रिय असलेल्या 59 अॅपवर सोमवारीबंदी लागू केली आहे. चीन व भारतामध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर तणावाची स्थिती असतानाच केंद्र सरकारने चिनी अपॅवर बंदीचा निर्णय घेतला आहे.

भारत-चीन संबंध
भारत-चीन संबंध

बीजिंग – भारताने चीनच्या 59 अॅपवर बंदी लागू केल्यानंतर चीनने प्रतिक्रिया दिली आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या संयुक्तिक आणि कायदेशीर अधिकाराला मदत करण्याची भारत सरकारची जबाबदारी असल्याचे चीनने म्हटले आहे.

केंद्र सरकारने टिकटॉक, युसी ब्राउझरसरह अनेक लोकप्रिय असलेल्या 59 अॅपवर सोमवारीबंदी लागू केली आहे. चीन व भारतामध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर तणावाची स्थिती असतानाच केंद्र सरकारने चिनी अपॅवर बंदीचा निर्णय घेतला आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले, की भारताच्या बाजूने नोटीस जारी केल्याने चीनला खूप चिंता आहे. आम्ही परस्थितीची पाहणी आणि पडताळणी करत आहोत. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्यासाठी चिनी उद्योजकांना चिनचे सरकार नेहमी विचारणा करते. त्यांनी विदेशात व्यावसायिक सहकार्य करण्याकरता स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करावे, यावर आम्ही भर देतो, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती अधिकार कायदा '69ए'प्रमाणे 59 अॅपवर बंदी लागू केले आहे. या अॅपमुळे देशाच्या सार्वभौमपणा, एकता, देशाची सुरक्षा, राज्यांची सुरक्षा आणि लोकांना धोका असल्याचे सरकारने आदेशात म्हटले होते. या निर्णयामागे कोट्यवधी मोबाईल आणि इंटरनेटचे वापरकर्त्यांचे हितसंरक्षण करणे आहे. भारतीय सायबर विश्वाचे सार्वभौम आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटले आहे. व्यावहारिक सहकार्य असणे हे चीन व भारताच्या फायद्याचे ठरेल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.