नवी दिल्ली – केंद्र सरकारने कोरोनाच्या लढ्यासाठी आणि आरोग्य यंत्रणेला तयारीसाठी राज्यांना 890.32 कोटींची आपत्कालीन जाहीर केली आहे. ही मदत 22 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून कोरोनाबाधितांच्या प्रमाणावारून राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. यामध्ये छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, राजस्थान, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदींनी 15 हजार कोटींचे पॅकेज केले होते जाहीर
केंद्र सरकार कोरोनाच्या लढ्यात आणि व्यवस्थापनात आघाडीची भूमिका घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले होते. त्यासाठी पंतप्रधानांनी 15 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्यामधून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना तांत्रिक आणि आर्थिक संसाधनांची मदत करण्यात येणार आहे.
हा होणार राज्यांना फायदा
राज्यांना आरोग्याच्या पायाभूत सुविधा बळकट करण्या दुसऱ्या टप्प्यातील निधीचा उपयोग करता येणार आहे. यामध्ये आरटी-पीसीआर, आरएनए किट, ट्रूनॅट आणि सीबी-एनएएटी या मशिनची खरेदी करणे शक्य होणार आहे. तसेच अतिदक्षता खाटांसाठी पायाभूत सुविधा व उपचार, ऑक्सिजन निर्मितीच्या मशीन आणि ऑक्सिजन कॉन्सेट्रेटची खरेदी करता येणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाच्या लढ्याकरता राज्य व केंद्रशासित प्रदेशांना एप्रिलमध्ये 3 हजार कोटींचा निधी वितरित केला होता. त्याचा उपयोग बहुतांश राज्यांनी कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यासाठी केला आहे.