ETV Bharat / business

'बीएसएनएलला आर्थिक पॅकेज देण्याकरिता सरकारचे नियोजन सुरू'

अर्जुन राम मेघवाल म्हणाले,  बीएसएनएलला प्रोत्साहन देणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. बीएसएनएलला सरकारकडून काही पॅकेज हवे आहे. त्यांनी चांगले काम करावे, अशी आमची इच्छा आहे.

बीएसएनएल
author img

By

Published : Sep 9, 2019, 7:48 PM IST

कोची - आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलला केंद्र सरकार आर्थिक पॅकेज देणार आहे. त्याबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती केंद्रीय अवजड आणि सार्वजनिक उद्योग राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली. ते एनडीए सरकारने १०० दिवस पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलत होते.

अर्जुन राम मेघवाल म्हणाले, बीएसएनएलला प्रोत्साहन देणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. बीएसएनएलला सरकारकडून काही पॅकेज हवे आहे. त्यांनी चांगले काम करावे, अशी आमची इच्छा आहे. बीएसएनएलला भविष्यात पॅकेजला दिलेले तुम्हाला दिसेल, असेही त्यांनी सांगितले. बीएसएनएलने पॅकेजसाठी पाठविलेला प्रस्ताव हा वित्तीय मंत्रालयाकडे आहे.

हेही वाचा-सीलबंद पाण्याच्या बाटलीसाठी प्लास्टिकला पर्याय शोधा, रामविलास पासवान यांची उत्पादकांना सूचना

ते पुढे म्हणाले, बीएसएनएल ही १९९५ मध्ये संकटात होती. मात्र, या कंपनीला प्रोत्साहन देण्याची सरकारची इच्छा आहे. ही कंपनी बंद करण्याचा विषय नाही. सरकार हे बीएसएनएल व एमटीएनएलचे विलिनीकरण करण्यावर काम करत आहे. मात्र काही कामगार संघटना त्याला विरोध करत दोन्ही स्वतंत्र संस्था ठेवण्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा-या प्रकल्पाकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक महाराष्ट्राला देणार २० कोटी डॉलरचे कर्ज

एमटीएनएल आणि बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनी आर्थिक संकटात आहेत. त्यांना काही महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या पगारी करणेही शक्य झाले नव्हते. केंद्र सरकारने बीएसएनएल व एमटीएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.