नवी दिल्ली - येस बँकेचा संस्थापक राणा कपूर याच्याभोवती कारवाईचा फास आणखी आवळला जात आहे. राणाची पत्नी आणि अवंता रिअॅल्टीचे प्रवर्तक गौतम थापर यांच्याविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने नव्याने गुन्हा नोंदविला आहे.
नवी दिल्लीमधील अमृता शेरगील मार्गावरील बंगल्याची खरेदी आणि थापर कंपनीला १ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज देताना नियम शिथील केल्याचा राणा कपूरविरोधात आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा-येस बँकेच्या फेररचना आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
सीबीआयने दिल्ली, मुंबई आणि इतर ठिकाणी झडती घेतल्या आहेत. यामध्ये कपूर याचे कार्यालय आणि राहते घर, ब्लिस अबोडशी निगडीत बिंदू यांचे कार्यालय, थापर आणि त्यांच्या कंपन्या आणि इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स या कार्यालयांचा समावेश आहे. दरम्यान पंधरा दिवसातच सीबीआयने राणा कपूर विरोधात गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा-येस बँकेच्या फेररचना आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
दरम्यान, राणा कपूर याचा ४ हजार ३०० कोटी रुपयांचा काळा पैसा व मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात सहभाग असल्याचे ई़डीला प्राथमिक तपासात आढळून आले आहे. कपूर आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात लूक आऊट नोटीस बजाविल्याने त्यांना विदेशात प्रवास करण्यावर मनाई करण्यात आली आहे. राणा हा १६ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहे.