ETV Bharat / business

जीएसटीच्या २ अधिकाऱ्यांना लाचखोरीप्रकरणी अटक, पुण्यात सीबीआयची कारवाई

२०१६ ते २०१७ दरम्यान असलेल्या सेवा कराबाबत तडजोड करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे ३ लाख रुपयांची मागणी केली होती.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 26, 2019, 7:46 PM IST

पुणे - जीएसटीचे दोन बडे अधिकारी लाचखोरी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेशषण विभागाच्या जाळ्यात अ़डकले आहेत. संजीव कुमार आणि विवेक देकाते असे रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. ही कारवाई जीएसटी कार्यालयात करण्यात आली.

२०१६ ते २०१७ दरम्यान असलेल्या सेवा कराबाबत तडजोड करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे ३ लाख रुपयांची मागणी केली होती. यामध्ये पहिला हप्ता असलेल्या १ लाखांची लाच घेताना दोन्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने संबंधित अधिकाऱ्यांचे कार्यालय आणि रहिवासी परिसराची झडती घेतली. तसेच त्यांच्या स्थावर आणि अचल संपत्तीची कागदपत्रे, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, कॉम्प्युटर हार्ड डिस्क आणि इतर कागदपत्रेही जप्त केली आहेत.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.