नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने येस बँकेच्या फेररचना योजनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेचा ४९ टक्के हिस्सा घेण्याचा स्टेट बँक ऑफ इंडियाला मार्ग मोकळा होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, भारतीय रिझर्व्ह बँकेने सुचविलेल्या फेररचनेच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
संबंधित बातमी वाचा-येस बँकेचे ७,२५० कोटींचे शेअर खरेदीला एसबीआय संचालक मंडळाची संमती
आरबीआयने येस बँकेचे प्रशासक म्हणून स्टेट बँकेचे माजी वित्तीय अधिकारी राहिलेले प्रशांत कुमार यांची नियुक्त करण्यात आली आहे.
संबंधित बातमी वाचा-येस बँकेच्या संस्थापकाकडून ४,३०० कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग - ईडी