नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटाने अनिश्चिततेचा सावट असताना अर्थव्यवस्था लवकर सावरण्याची चिन्हे दिसत नाही. अशा स्थितीत सोन्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. तज्ज्ञांचे मते देशात सोन्याचे दर येत्या काही महिन्यात दिवाळीपर्यंत 52 हजार रुपये प्रति तोळा होण्याची शक्यता आहे.
सध्याची परिस्थिती राहिली तर सोने दोन वर्षात प्रति तोळा 65 हजार रुपये होईल, असाही तज्ज्ञांनी अंदाज केला आहे. ऑगस्टच्या सौद्यांसाठी बुधवारी मल्टा कमोडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) सोन्याचा दर प्रति तोळा 48,589 रुपये झाला होता. हा आजपर्यंतचा सोन्याचा सर्वाधिक दर राहिला आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अजूनही विक्रमी झाले नाहीत. येत्या काही दिवसात सोन्याचे दर विक्रमी होणार आहेत.
जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनिश्चितता आणि भय निर्माण झाली आहे. डीव्हीपी फॉर कमोडिटीज करन्सीज रिसर्चचे अनुज गुप्ता म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस 1 हजार 790 डॉलर होवू शकतात. सध्या, सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंस हे 1 हजार 762 रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देशाचा विकासदर हा 4.5 टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज केला आहे. याकडेही गुप्ता यांनी लक्ष वेधले. जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख हरीश व्ही. म्हणाले, की सोन्यामधील सुरक्षित गुंतवणूक सर्वांना आकर्षित करते. जागतिक अर्थव्यवस्था कमी वेळेत सुधारेल, ही शक्यता खूप कमी आहे. दुसरीकडे कोरोनाचे जगभरात प्रमाण वाढत आहे. भू-राजकीय अस्थिरता वाढत असताना डॉलरची कामगिरी घसरली आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे