नवी दिल्ली - केंद्र सरकारने उत्सर्जनच्या नियमनानुसार वाहनांचे पुढील वर्षी एप्रिलपासून भारत स्टेज - ६ (बीएस-६) मध्ये संक्रमण करणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय म्हणजे पत्त्यामधील जोकर अशी टीका बजाज ऑटोने केली आहे. या निर्णयामुळे जुनी बीएस ४ वाहने ही देशातील बाजारपेठेतून डम्प होतील, असा कंपनीने इशारा दिला आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने किमतीचे युद्ध (अनवॉरंटेड प्राईस वॉर) दुसऱ्या तिमाहीपासून सुरू होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.
पुण्यात असलेल्या बजाज ऑटो कंपनीने आर्थिक वर्ष २०१८-२०१९ चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. एप्रिल २०२० पूर्वीच काही महिने अगोदर बीएस-६ च्या निकषानुसार वाहनांचे उत्पादन होणार असल्याचे कंपनीने अहवालात म्हटले आहे. कंपनीकडून दुचाकी, तिचाकीसह क्वॉड्रिसायकलचे उत्पादन घेते.
स्पर्धकांची बीएस-६ ची तयारी स्वीकारणे कठीण आहे. आर्थिक वर्ष २०२० च्या दुसऱ्या तिमाहीदरम्यान बहुतांश स्पर्धक कंपन्यांचा विक्री न झालेला बीएस-४ वाहनांचा मोठा साठा शिल्लक आहे. त्यामुळे त्या कंपन्यांकडून वाहने बाजारात डम्प करण्यात येतील, असे कंपनीने म्हटले आहे. यामुळे चुकीच्या पद्धतीने किमतीचे युद्ध सुरू होईल, त्यातून सर्वांची हानी होणार आहे. हे सर्व निश्चितपणे घडणार असल्याचा आमचा दावा नाही. मात्र ही जोखीम असल्याने त्याकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
देशातील वाहनांच्या बाजारपेठेत आणखी स्पर्धा होईल, असे बजाज ऑटोने म्हटले आहे.असे असले तरी १६ हजार कोटी रुपये अतिरिक्त निधी असल्याने आम्ही स्पर्धेला सामर्थ्याने तोंड देवू शकतो. निर्यात हे मुख्य सामर्थ्य असल्याचे कंपनीने शेअरधारकांना सांगितले आहे.
वाहनांच्या ईलेक्ट्रिकमधील संक्रमणावर कंपनीचा आहे आक्षेप-
नुकताच बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी ईलेक्ट्रिकमधील संक्रमणावर आक्षेप घेतला होता. १०० टक्के वाहनांचे ईलेक्ट्रिकमध्ये संक्रमण करण्याचा निर्णय पूर्णपणे अनावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच हा निर्णय अव्यवहारिक असल्याचे त्यांनी म्हटले होते.