नवी दिल्ली- इंधनातील दरवाढीने सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. या दरवाढीने राजस्थानमधील श्रीनगर शहरात प्रिमियम पेट्रोलच्या किमती प्रति लिटर १०० रुपयांवरून अधिक झाले आहेत.
देशभरातील विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर २५ पैशांनी वाढल्या आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ८६.३० रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ९२.८६ रुपये आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्प: ई-कॉमर्स उद्योगांकरता सरकार तरतूद करणार
- दिल्लीत डिझेलची किंमत प्रति लिटर ७६.२३ रुपये तर मुंबईत प्रति लिटर ८३.०३ रुपये प्रति लिटर आहे.
- श्रीनगरमध्ये पेट्रोलचा दर साधारणत: ९८.४० रुपये प्रति लिटर आहे. तर ब्रँडेड पेट्रोलचा दर प्रति लिटर १०१.१५ रुपये प्रति लिटर आहे.
- दिल्लीत ब्रँडेड पेट्रोलचा दर प्रति लिटर ८९.१० रुपये आहे.
- मुंबईत ब्रँडेड पेट्रोलचा दर प्रति लिटर ९५.६१ रुपये आहे.
- साधारण पेट्रोल आणि प्रिमियम दर्जाच्या इंधनांमध्ये ओक्टेन क्रमांकाचा फरक आहे. सामान्य इंधनात ओक्टेनची संख्या ८७ आहे. तर प्रिमियम इंधनात ओक्टेनची संख्या ९१ किंवा त्याहून अधिक आहे. पेट्रोल व डिझेलचे दर मंगळवारी प्रति लिटर ३५ पैशांनी वाढले होते.
हेही वाचा-विदेशातील गुंतवणुकीत भारतीय कंपन्यांची ४२ टक्क्यांनी घट