ETV Bharat / business

पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, एमएसएमईमधून नोकऱ्या निर्मितीला प्राधान्य - गडकरी

नितीन गडकरींचा नागपूरमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात १९५७ ला जन्म झाला. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्रात अनेक उड्डाणपुल बांधली आहेत. तेव्हा त्यांना 'फ्लायओव्हर मॅन' अशी ओळख मिळाली आहे.

नितीन गडकरी हे पत्नी व अधिकाऱ्यांसमेवत पदभार घेताना
author img

By

Published : Jun 4, 2019, 2:49 PM IST

नवी दिल्ली - भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक, महामार्ग आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्राच्या (एमएसएमई) मंत्रालयाचा पदभार आज स्वीकारला आहे. यावेळी त्यांनी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, एमएसएमई क्षेत्रामधून नोकऱ्यांच्या निर्मितीला करण्याला प्राधान्य असल्याचे सांगितले.

गडकरी हे विविध समस्या सोडविण्यासाठी असलेले प्रशासकीय कौशल्य आणि नवदृष्टीकोनासाठी परिचित आहेत. मागील एनडीए सरकारमध्ये सर्वात अधिक कार्यक्षम असलेल्या केंद्रीय मंत्र्यांपैकी गडकरी हे आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याला माझे प्राधान्य असणार आहे. त्याचबरोबर देशाचा आर्थिक विकास दर वाढविणे आणि लघू उद्योगातून नोकरी निर्मितीला प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. पदभार स्विकारताना गडकरी यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी कांचन या होत्या.

एनडीए सरकारमध्ये ३.८५ लाख कोटींची रस्ते कामे -

एनडीए सरकारमध्ये त्यांनी ३.८५ लाख कोटींची रस्त्यांची कामे केली आहेत. गंगा नदीत मालवाहू जहाजांची वाहतूक त्यांनी सुरू केली आहे. त्यांनी मे २०१४ मध्ये रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. याचबरोबर जलस्त्रोत, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाचा कारभार ३ सप्टेंबर २०१७ पासून पाहिला आहे. गडकरींनी ४ जून ते ९ नोव्हेंबर २०१४ पर्यंत ग्रामीण विकास आणि पंचायतराजसह जलस्वच्छता मंत्रालयाचे कामकाजही पाहिले आहे.

असा आहे गडकरींचा राजकीय प्रवास-
नितीन गडकरींचा नागपूरमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात १९५७ ला जन्म झाला. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्रात अनेक उड्डाणपुल बांधली आहेत. तेव्हा त्यांना 'फ्लायओव्हर मॅन' अशी ओळख मिळाली आहे. गडकरींनी युती सरकारच्या काळात मुंबई-पुणे महामार्गाचे काम यशस्वीपणे केले. त्यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीतून मतदारांनी निवड केली आहे. भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.

अभाविपचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी विद्यार्थीदशेत राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या जनता युवा मोर्चा शाखेत सहभागी झाले. इंदिरा गांधींनी जून १९७५ मध्ये देशात आणीबाणी जाहीर केल्यानंतर त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. त्यांनी वकिली सोडून संपूर्ण आयुष्य समाजकार्याला देण्याचा निर्णय घेतला. नागपूरच्या लोकसभा निवडणुकीत गडकरींनी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा सुमारे २.१३ लाख मतांनी पराभव केला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.