ETV Bharat / business

ब्लॅक फंग्स : 'अॅम्फोटेरिसीन बी'चा तुटवडा कमी करण्याकरता केंद्राचे प्रयत्न - मनसुख मांडवीय - मनसुख मांडवीय

म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी असणाऱ्या अॅम्फोटेरिसीन-बीच्या तुटवड्याची समस्या लवकरच सोडविली जाणार असल्याचे केंद्रीय रसायन मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट केले. येत्या तीन दिवसांमध्ये आणखी ५ कंपन्यांना देशात नवीन औषध निर्मितीसाठी परवानगी मिळणार आहे.

मनसुख मांडवीय
मनसुख मांडवीय
author img

By

Published : May 20, 2021, 10:31 PM IST

नवी दिल्ली - म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी लागणाऱ्या अॅम्फोटेरिसीन-बी या औषधाचा तुटवडा आहे, ही समस्या लवकरच सोडविली जाणार असल्याचे केंद्रीय रसायन मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले. औषधाच्या निर्मितीसाठी नवीन औषध कंपन्यांना परवानगी मिळणार असल्याचेही केंद्रीय मंत्री मांडवीय यांनी सांगितले. म्युकरमायकोसिस हा रोग ब्लॅक फंग्स या नावानेही ओळखला जातो. या रोगाची लागण झाल्यास नाक, डोळे आणि मेंदुचेही नुकसान होऊ शकते.

म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी असणाऱ्या अॅम्फोटेरिसीन-बीच्या तुटवड्याची समस्या लवकरच सोडविली जाणार असल्याचे केंद्रीय रसायन मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट केले. येत्या तीन दिवसांमध्ये आणखी ५ कंपन्यांना देशात नवीन औषध निर्मितीसाठी परवानगी मिळणार आहे. यापूर्वी ५ कंपन्यांना परवानगी मिळाली आहे.

हेही वाचा-वेळेवर उपचार घेतले म्हणून म्यूकरमायकोसिसवर मात केली; नाशकातील महिलेचा अनुभव

या कंपन्यांकडून होणार अॅम्फोटेरिसीन-बीचे उत्पादन

सध्या परवानगी असलेल्या औषधी कंपन्यांनी औषधाचे उत्पादन वाढविण्यास सुरुवात केली आहे. अॅम्फोटेरिसीन-बीचे ६ लाख डोस आयात करण्याची भारतीय कंपन्यांना परवानगी मिळाली आहे. परिस्थिती सामान्य होण्यासाठी आम्ही कोणतेही कमतरता ठेवत नाही. एम्क्यूर फार्मा, नाटको फार्मा, गुफीक बायोसायन्सेस, एलेम्बिक फार्मासिट्युकल्स आणि लिका फार्मा या कंपन्यांना नुकतेच अॅम्फोटेरिसीन-बीचे उत्पादन घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मायलॅन, बीडीआर फार्मा, सन फार्मा आणि सिप्ला कंपनीने या औषधांची यापूर्वीच निर्मिती सुरू केल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-म्यूकरमायकोसिसचा विळखा; मित्रांनी जमवले 30 लाख रुपये; तरीही औषध मिळेना

राज्यात अॅम्फोटेरिसीन-बीचा तुटवडा

राज्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असतानाच आता डॉक्टरांसमोर एक वेगळीच अडचण उभी ठाकली आहे. ती म्हणजे या आजारावरील इंजेक्शनची टंचाई आहे. अॅम्फोटेरिसीन-बी आणि 'इसावूकोनाझोल' या इंजेक्शनचा मोठा तुटवडा देशात निर्माण झाला आहे. वेळेत रुग्णाला इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचा धोका वाढण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. हे इंजेक्शन सरकारने मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, आणि रुग्णांना वाचवावे अशी मागणी डॉक्टरांकडून केली जात आहे.

हेही वाचा-...तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना कसा करणार? - डॉ. अविनाश भोंडवे

असा होतो म्युकरमायकोसिस-

माती, हवा, कुजलेल्या ठिकाणी बुरशी असते. बुरशी नाकाद्वारे शरीरात प्रवेश करते. नाकाच्या मागच्या बाजूला सायनस या ठिकाणी ही बुरशी जमा होते. ती वाढत जाऊन मेंदूपर्यंत शकते', असे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर तात्याराव लहाने म्हणाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आजार फक्त डोळ्यापुरताच मर्यादित नाही. हा आजार फुप्फुसांनाही होऊ शकतो किंवा आपल्या पचन संस्थेच्याजवळही येऊ शकतो. याची बाधा आपल्या त्वचेलाही होऊ शकते, असे डॉक्टर तात्याराव लहाने यांनी सांगितले.

ही घ्या काळजी-

'डोळ्यांना सूज येणे, डोके दुखणे, ताप येणे, नाकातून पाणी गळणे, त्याचबरोबर टाळूला काळे डाग पडणे, त्या भागामध्ये बधिरता येणे, तसेच डोळ्यांची नजर कमी होणे, ही लक्षणे डॉक्टर तात्याराव लहाने यांनी सांगितली आहेत. 'कोरोनाच्या काळामध्ये ज्या रुग्णांना मधुमेह आहे किंवा ज्यांचा मधुमेह नियंत्रित नाही, तसेच ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे; अशा रुग्णांना म्यूकरमायकोसिस आजाराची लागण होताना दिसते. या आजारापासून दूर राहायचे असेल तर मधुमेह नियंत्रित ठेवला पाहिजे. तसेच ज्या पदार्थाला बुरशी आहे, असे पदार्थ खाऊ नये. आपल्या शरीरात बुरशी जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. साधे डोके दुखत असेल तर काळी बुरशी हा आजार झाला आहे, असे समजू नये. इतर लक्षणे आहेत का ते अगोदर तपासून डॉक्टरांचा सल्ला घेणे हे महत्त्वाचे आहे', असेही डॉक्टर लहाने यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.