ETV Bharat / business

कमलनाथांचे वचनपूर्तीसाठी प्रयत्न : कुमार मंगलम बिर्ला मध्यप्रदेशमध्ये बांधणार १०० हायटेक गोशाळा - Kumar Mangalam Birla

बिर्ला कंपनीकडून येत्या १८ महिन्यात गोशाळा बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या जाहिरनाम्यातील  महत्त्वाच्या वचनाची पूर्ती होणार आहे.

कमलनाथ
author img

By

Published : Aug 10, 2019, 7:37 PM IST

भोपाळ - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दोन दिवसीय मुंबई दौरा केला होता. याची फलनिष्पत्ती म्हणून उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांनी हायटेक १०० गोशाला बांधण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा (सीएसआर) निधीचा वापर बिर्ला कंपनी करणार आहे.

भाजप सरकारने मध्यप्रदेशमध्ये गो-कल्याणची योजना राबविली होती. या योजनेत भटक्या गायींचा समावेश नव्हता. त्यानंतर काँग्रेसने भाजपच्या हिंदुत्वाचा मुद्दा सौम्य करण्यासाठी 'गो -संरक्षण' राबविणार असल्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते. बिर्ला कंपनीकडून येत्या १८ महिन्यात गोशाळा बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या जाहिरनाम्यातील महत्त्वाच्या वचनाची पूर्ती होणार आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी उशीर झाल्याने मध्यप्रदेश सरकारला तोंडघशी पडावे लागले आहे. उद्योजक बिर्ला यांनी आश्वासन दिल्यामुळे सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे.

पशुसंवर्धन मंत्रालयातील सूत्राच्या माहितीनुसार मध्यप्रदेश सरकार इतर कंपन्यांच्या संपर्कात आहेत. या कंपन्यांच्या सहकार्यातून येत्या ५ वर्षात स्मार्ट गोशाळा सुरू करण्यात येणार आहेत.

Intro:Body:

business

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.