हैदराबाद - देशात कोरोना लशीचा तुटवडा निर्माण झाला असताना दिलासादायक बातमी आहे. भारत बायोटेकने कोरोना लस कोव्हॅक्सिनची उत्पादनक्षमता वाढविली आहे. त्यामुळे भारत बायोटेककडून वर्षभरात ५० कोटी ऐवजी ७० कोटी लशींचे उत्पादन होऊ शकणार आहे.
भारतय बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने हैदराबाद आणि बंगळुरूमधील उत्पादन प्रकल्पाची क्षमता टप्प्याटप्प्याने वाढविली आहे. सुत्राच्या माहितीनुसार कंपनीची कोव्हॅक्सिनची यापूर्वीच वार्षिक २० कोटी डोस निर्मितीची क्षमता होती. लस निर्मिती प्रक्रियेचा विस्तार करणे ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे. त्यासाठी गुंतवणूक आणि काही वर्षे लागत असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे.
हेही वाचा-जालना : कोविशिल्ड लसीचा साठा संपला; उद्या लसीकरण केंद्र बंद पडण्याची शक्यता
कमी कालावधीत कोव्हॅक्सिनच्या उत्पादनाची क्षमता वाढविण्यासाठी भारत बायोटेक सक्षम आहे. कारण नवीन बीएसएल-३ प्रमाणित सुविधा मिळाल्या आहेत. अशा प्रकारच्या देशात प्रथमच उत्पादनाच्या सुविधा आहेत. त्यामधून आधी असलेल्या तज्ज्ञांच्या मदतीने चाचणी आणि अत्यंत शुद्ध व निष्क्रिय विषाणू असलेल्या लशी मिळू शकतात. विविध देशांबरोबर भागीदारी करून उत्पादनांची भागीदारी केली आहे. भारत बायोटेकने औषधी घटकांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाटी इंडियन इम्म्युनोलॉजिकल्सबरोबर (आयआयएल) भागीदारी केली आहे. कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी भारतासह जगभरातील अनेक देशांनी परवानगी दिली आहे.
हेही वाचा-जॉन्सन अँड जॉन्सनची भारतात लवकरच येणार लस; केंद्राकडे मागितली परवानगी
दरम्यान, १ मे रोजीपासून देशात १८ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकला लशीच्या उत्पादनासाठी केंद्र सरकारने १५०० कोटी मंजूर केले आहेत. भारत बायोटेकने जुलैपर्यंत ९ कोटी डोस देणे सरकारला अपेक्षित आहे.
लस नसल्याने लसीकरणाला लागला ब्रेक
मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असताना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. मात्र, लसीचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने आज (मंगळवार) ३५ लसीकरण केंद्र बंद करावी लागली आहेत. मुंबईत या आधीही लसीचा तुटवडा झाला होता. आता दुसऱ्यांदा लसीचा तुटवडा झाल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली आहेत. मात्र आज (मंगळवार) लसीचा साठा आल्यावर उद्यापासून सर्व लसीकरण केंद्र पुन्हा सुरु केली जातील, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.