ETV Bharat / business

अॅमेझॉनच्या सीईओकडून महागड्या मालमत्तेची खरेदी, न्यूयॉर्कमधील तीन अपार्टमेंटकरिता देणार ५६० कोटी

नुकताच पत्नीकडून विभक्त झालेल्या ५५ वर्षीय बेझोसने नोमॅड अपार्टमेंटमधील वरचे मजले खरेदी केले आहेत. ही मालमत्ता मॅडिसन स्क्वेअर पार्कमध्ये आहे.

जेफ बेझोस
author img

By

Published : Jun 5, 2019, 2:56 PM IST

न्यूयॉर्क - जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांची खरेदीही त्यांच्या श्रीमंतीला साजेशी अशीच आहे. न्यूयॉर्कमध्ये त्यांनी सुमारे ५६० कोटी रुपयांमध्ये तीन अपार्टमेंटची खरेदी केली आहे. हे अपार्टमेंट न्यूयॉर्कमधील अत्यंत उच्चभ्रूवस्ती मानल्या जाणाऱ्या प्राईम मॅनहॅटनमध्ये आहेत.

नुकताच पत्नीकडून विभक्त झालेल्या ५५ वर्षीय बेझोसने नोमॅड अपार्टमेंटमधील वरचे मजले खरेदी केले आहेत. ही मालमत्ता मॅडिसन स्क्वेअर पार्कमध्ये आहे. त्यामध्ये तीन मजली पेंट हाऊस आहेत.
जेफने मालमत्ता खरेदी केल्याने तेथील शेजारी अत्यंत आनंदित झाले आहेत. त्यांना मालमत्तेचे दर वाढतील, अशी अपेक्षा आहे. बेझोस हे मे महिन्यापासून मालमत्ता खरेदीच्या प्रक्रिया करत होते. मात्र इमारतीच्या विकसकाने ही बाब गोपनीय ठेवली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.