मुंबई - तुम्हाला बँकेमध्ये कोणते काम करायचे असेल तर ते लवकर पूर्ण करा. कारण, येत्या चार दिवस बँका बंद राहणार आहेत. महिनाअखेर असताना चार दिवस बँक राहत असल्याने होणारी धावपळ टळू शकेल.
चालू महिन्यात 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत बँका बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार या चार दिवशी बँका बंद राहणार आहेत. 28 ऑगस्टला चौथा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. तर 29 ऑगस्टला रविवार ही साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका बंद राहणार आहेत. 30 ऑगस्टला जन्माष्टमी असल्याने बँका बंद राहणार आहेत. तर देशातील काही शहरांमध्ये 31 ऑगस्टलाही बँकांना सुट्टी असणार आहे.
हेही वाचा- अमिताभ बच्चन यांचा सुरक्षा रक्षक जितेंद्र शिंदेंची बदली; संपत्तीची होणार चौकशी?
या कारणाने बँकांना असणार सुट्टी
आरबीआय ही विविध राज्यांतील उत्सवांप्रमाणे सुट्ट्या जाहीर करते. त्यानुसार अहमदाबाद, चंडीगड, चेन्नई, डेहराडून, जयपूर, लखनौ, गंगटोक, श्रीनगर, शिलांग, शिमला, रायपूर, पाटणा, कानपूर आणि जम्मूमध्ये जन्माष्टमीनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे. देशातील काही शहरांमध्ये 31 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे.
हेही वाचा- आत्मघातकी हल्ल्यानंतर आज पुन्हा अमेरिकेकडून निर्वासन उड्डाणे तातडीने सुरू
ऑगस्टमध्ये बँकांना 15 दिवस सुट्टी
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार ऑगस्टमध्ये बँका रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार या कारणांनी सहा दिवस बंद राहणार आहेत. तर बँकांना इतर 9 सुट्टी असणार आहेत. मात्र, या सुट्टी एकाच राज्यात नसून विविध राज्यांत वेगवेगळ्या सुट्टी आहेत. अशा पद्धतीने बँकांना एकूण 15 दिवस सुट्टी असल्याचे आरबीआयच्या वेळापत्रकात नमूद केले आहे.
हेही वाचा- शिबानी दांडेकरने खास जागेवर गोंदले 'बॉयफ्रेंड' फरहान अख्तरचे नाव!!
असे करा बँकांच्या कामांचे नियोजन
- तुम्ही पैसे काढणे किंवा जमा करणे असे आर्थिक व्यवहार तुम्ही नेटबँकिंग द्वारे पूर्ण करू शकता.
- जर रोकड रकमेची आवश्यकता असले तर पुरेशी रक्कम आधीच काढून घेऊ शकता.
- जेणेकरून बँकांच्या सुट्टी असताना एटीएममध्ये पर्याप्त पैसे नसताना होणारी धावपळ टळू शकते.
- जर तुम्हाला बँकांच्या सुट्टी कालावधीमध्ये रोख पैसे खात्यावर भरायचे असेल, तर काही एटीएमवर तशी सुविधा असते.