नवी दिल्ली - सणाच्या काळात बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना खूश करणारी कर्ज योजना जाहीर केली आहे. बँक ऑफ इंडियाने कर्जावर घेण्यात येणारे प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. तसेच गृहकर्जावर सवलत देण्याचे जाहीर केले आहे.
बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक सलील कुमार स्वैन यांनी किरकोळ कर्जावारील प्रक्रिया शुल्क माफ करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच गृहकर्जावरील व्याजात सवलत दिल्याची त्यांनी माहिती दिली. गृहकर्ज हे 30 लाखापर्यंत घेतल्यास त्यासाठी वार्षिक 8.35 टक्के व्याजदर असणार आहे. तर 30 लाखांहून अधिक कर्ज घेतल्यास ते रेपो दराशी संलग्न असणार असल्याचे स्वैन यांनी सांगितले.
हेही वाचा-बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना खूशखबर.. कर्ज होणार स्वस्त
शिक्षण कर्ज हे इतर बँकांशी स्पर्धा करण्याच्या तोडीच्या दरात देण्यात येणार आहे. 'एसएमई वेलकम' कर्ज हे 50 लाख ते 5 कोटीपर्यंत सवलतीच्या व्याजदरात देण्यात येणार आहे. कर्जासाठी असलेल्या सुरक्षेवर व्याजाचा दर निश्चित करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
हेही वाचा-भारतीय कंपन्यांवरील कर्जाचा बोझा जुलैमध्ये गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट
गेल्या महिन्यात सणाच्या मुहुर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्ज व वाहन कर्ज सवलतीच्या व्याज दरात जाहीर केले.
हेही वाचा-नोटांची सत्यता पडताळण्याकरिता दृष्टीहीनांसाठी आरबीआय आणणार अॅप, इंटरनेटचीही नाही भासणार गरज