नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या मालकीची बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांना शेअर विकले आहेत. यामधून बँकेने ६६० कोटी गोळा केले आहेत.
बँक ऑफ इंडियाने एम्प्लॉईज शेअर पर्चेस स्किममधून कर्मचाऱ्यांना शेअर विकले. बँकेने कर्मचाऱ्यांना शेअरच्या खरेदीत २४.२८ टक्के सूट दिली. बँकेने कर्मचाऱ्यांना ६,२५,५२,१८८ अशा संख्येत प्रत्येकी १० रुपयांचे शेअर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले होते. या शेअर खरेदी योजनेत ९४.७० टक्के कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याचे बँकेने म्हटले आहे. या शेअरची मुदत एक वर्षाची आहे.