ETV Bharat / business

महामारीचा फटका; बजाज ऑटोच्या वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये ९ टक्क्यांची घसरण - Latest Bajaj Auto sale

बजाज ऑटोच्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये एकूण ३ लाख ५६ हजार १९९ वाहनांची विक्री झाली आहे. तर गतवर्षी ऑगस्टमध्ये ३ लाख ९० हजार २६ वाहनांची विक्री झाली होती.

संग्रहित-बजाज ऑटो
संग्रहित-बजाज ऑटो
author img

By

Published : Sep 2, 2020, 7:54 PM IST

मुंबई - कोरोना महामारीचा बजाज ऑटोच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. बजाज ऑटोच्या एकूण वाहन विक्रीत यंदा ऑगस्टमध्ये ९ टक्क्यांची गतवर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत घसरण झाली आहे.

बजाज ऑटोच्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये एकूण ३ लाख ५६ हजार १९९ वाहनांची विक्री झाली आहे. तर गतवर्षी ऑगस्टमध्ये ३ लाख ९० हजार २६ वाहनांची विक्री झाली होती.

हेही वाचा-सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

  • बजाज ऑटोची देशात एकूण १ लाख ८५ हजार ८७९ वाहनांची विक्री झाली होती. तर गतवर्षी देशात एकूण २ लाख ८ हजार १०९ वाहनांची विक्री झाली होती.
  • चालू वर्षात ऑगस्टमध्ये १ लाख ७० हजार ३२० वाहनांची निर्यात झाली आहे. गतवर्षी बजाजच्या १ लाख ८१ हजार ९१७ वाहनांची निर्यात झाली होती.
  • दुचाकींच्या एकूण विक्रीत १ टक्क्यांची घसरण झाली आहे. चालू आर्थिक वर्षात ऑगस्टमध्ये ३ लाख २१ हजार ५८ दुचाकींची विक्री झाली आहे. तर गतवर्षी ३ लाख २५ हजार ३०० दुचाकींची विक्री झाली होती.
  • बजाजच्या वाणिज्य वाहनांच्या विक्रीला सर्वाधिक ४६ टक्क्यांच्या घसरणीने फटका झाला आहे. चालू वर्षात ऑगस्टमध्ये ३५ हजार १४१ वाणिज्य वाहनांची विक्री झाली आहे. तर गतवर्षी ऑगस्टमध्ये ६४ हजार ७२६ वाणिज्य वाहनांची विक्री झाली होती.

हेही वाचा-महामारीत डिजिटल कौशल्यासह दूरस्थ शिकण्याच्या प्रमाणात २४५ टक्क्यांनी वाढ

कोरोना महामारीत दोन महिने टाळेबंदी राहिल्याने देशातील उद्योग व व्यवसायांवर परिणाम झाला आहे. टाळेबंदी काढल्यानंतरही देशातील उद्योग, व्यवसाय व अर्थव्यवस्था सावरलेली नाही. त्याचा परिणाम वाहन उद्योगासह विविध क्षेत्रावर दिसून आलेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.