ETV Bharat / business

बजाज ऑटोची पल्सर एनएस १२५ लाँच, जाणून घ्या किंमत - Bajaj Auto sport bike

बजाज ऑटोचे (मोटरसायकल) अध्यक्ष सारंग कानडे म्हणाले की, नवीन एनएस १२५ हे रोमांचक अनुभव देते. ही दुचाकी विविध वर्गातील लोकांना महत्त्वाचे फीचर देणार आहे.

Pulsar NS 125
पल्सर एनएस १२५
author img

By

Published : Apr 20, 2021, 5:10 PM IST

नवी दिल्ली - तुम्हाला स्पोर्ट बाईक आवडत असेल तर बजाजने तुमच्यासाठी पर्याय दिला आहे. बजाज ऑटो कंपनीने नवीन पल्सर एन १२५ ही दुचाकी लाँच केली आहे. या दुचाकीची किंमत ९३,६९० रुपये (एक्स शोरूम दिल्ली) आहे.

पल्सर एनएस १२५ या इंजिनमध्ये १२५सीसी बीएस-६ डीटीएस-आय इंजिन आहे. त्यामधून १२ पीएस उर्जा निघते. दुचाकीत नायट्रोक्स मोनो शॉक अबसॉर्बर्स आहेत. त्यामुळे वेगवान गती असताना दुचाकीस्वाराला स्थिरता मिळू शकते, असे बजाज कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे सीरमकडून स्वागत

बजाज ऑटोचे (मोटरसायकल) अध्यक्ष सारंग कानडे म्हणाले की, नवीन एनएस १२५ हे रोमांचक अनुभव देते. ही दुचाकी विविध वर्गातील लोकांना महत्त्वाचे फीचर देणार आहे. पल्सर १२५ ला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. नवीन एनएस १२५ ही दुचाकीही स्पोर्ट बाईक श्रेणीमध्ये स्थान भक्कम करेल, असा आम्हाला विश्वास आहे.

हेही वाचा-जॉन्सन अँड जॉन्सनची भारतात लवकरच येणार लस; केंद्राकडे मागितली परवानगी

बजाज ऑटोने पल्सर एनएस सिरीज ही एनएस २०० आणि एनएस १६० या दोन श्रेणीमध्ये उपलब्ध केली आहे. दोन्ही मॉडेलच्या किंमती एन्ट्री स्पोर्ट श्रेणीत अत्यंत स्पर्धात्मक आहे. बजाजने पहिल्यांदा स्पोर्ट बाईकची आवड असलेल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठीच हे एनएन १२५ मॉडेल बाजारात आणले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.