नवी दिल्ली - मारुती सुझुकी इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक जगदीश खट्टर यांचे आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी मारुती कंपनीची वाहन उद्योगात विशेष ओळख निर्माण केली होती.
जगदशी खट्टर हे जुलै १९९३ मध्ये मारुती उद्योग लि. कंपनीत संचालक (मार्केटिंग) म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर सहा वर्षांनी ते मार्केटिंगमध्ये कार्यकारी संचालक झाले. १९९९ मध्ये खट्टर यांची मारुतीमध्ये संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी पदोनती झाली. त्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून मे २००२ मध्ये धुरा स्वीकारली. वयाच्या ६५ व्या वर्षी २०९७ मध्ये ते निवृत्त झाले. मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव म्हणाले, की आयएएस ते मारुती रुजू होणारे जगदशी खट्टर हे पहिल्या दर्जाचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने वैयक्तिक व वाहन उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा-अॅमेझॉन भारताला देणार १० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स
जगदीश खट्टर यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केला होता गुन्हा-
केंद्रीय गुन्हे अन्वशेषण विभागाने (सीबीआय) मारुती उद्योगाचे माजी व्यवस्थापकीय संचालक जगदीश खट्टर यांच्याविरोधात डिसेंबर २०१९ मध्ये गुन्हा दाखल केला आहे. खट्टर यांनी ११० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा सीबीआयने दावा केला. जगदीश खट्टर आणि त्यांची कंपनी कारनॅशन ऑटो इंडिया कंपनीमुळे पंजाब नॅशनल बँकेचे ११० कोटी रुपयांचे नुकसान झाले. खट्टर यांनी मारुती उद्योग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून १९९३ ते २००७ पर्यंत काम केले आहे. निवृत्तीनंतर दोन वर्षांनी खट्टर यांनी कारनेशन ही कंपनी सुरू केली. या कंपनीला २००९ मध्ये १७० कोटी रुपयांचे कर्ज मिळाले. हे कर्ज २०१५ मध्ये पंजाब नॅशनल बँकेने बुडित कर्ज म्हणून घोषित केले.
हेही वाचा-टाटा स्टीलकडून आठवडाभरात ऑक्सिजनची दुप्पट निर्मिती; रोज 600 टनचा पुरवठा