नवी दिल्ली - तुम्ही ट्विटर वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. काही अज्ञात वाईट व्यक्तींनी ट्विटर अॅपमध्ये मॅलिसियस कोड टाकल्याची ट्विटरने म्हटले आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील वापरकर्त्याची माहिती लीक झाल्याची ट्विटरने भीती व्यक्त केली आहे.
ट्विटरने ईमेल करत ट्विटर अॅप अपडेट करण्याच्या सूचना काही भारतीय वापरकर्त्यांना केल्या आहेत. अॅपमधील सुरक्षा धोक्यात आल्याने वापरकर्त्यांनी त्यावरील नियंत्रणही गमाविले होते, असे ट्विटरने म्हटले आहे. त्यामुळे वापरकर्त्याशिवाय वाईट व्यक्तीला मेसेज, ठिकाणाची माहिती मिळणे शक्य होते.
हेही वाचा-फिचनेही घटविला देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाजित विकासदर
काय म्हटले आहे ट्विटरने?
अॅपमध्ये मॅलिसियस कोड असल्याचा कंपनीकडे थेट पुरावा नाही. ही समस्या दूर करण्यासाठी थेट वापरकर्त्याला सूचित करत आहोत. ट्विटर अॅप आणि ईमेलमधून आम्ही वापरकर्त्यांना विशेष सूचना देवू ट्विटर अकाउंट सुरक्षित राहण्याचे कळवित आहोत. ट्विटरने नवे अँड्राईड अॅप अद्ययावत करण्याची शिफारस केली आहे. जे घडले त्याबद्दल आम्हाला दु:ख आहे. ट्विटरवरील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे ट्विटरने भारतीय वापरकर्त्यांना केलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-आर्थिक वर्षाखेर बँक क्षेत्रातील एनपीए स्थितीत सुधारणा होईल- एसबीआय चेअरमन
गुगलने दोनच दिवसापूर्वी डेस्कटॉप आणि मोबाईलच्या ब्राउझरमध्ये काही वेबसाईट सुरक्षित नसल्याचा पॉप अपमधून इशारा दिला होता. काही वेबसाईट आणि अॅपमधून वापरकर्त्याचे पासवर्ड घेतले जात असल्याचे गुगलने म्हटले होते. वैयक्तिक गोपनीयतेसाठी इंटरनेट वापरकर्त्यांना हे वर्ष अत्यंत चिंताजनक ठरले आहे.