नवी दिल्ली - तुम्ही घरून काम करत असाल अथवा स्मार्टफोनचा अधिक वापर करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाच्या संकटात सायबर हल्ल्याचे नवे संकट निर्माण झाले आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सायबर हल्ल्याचे प्रमाण वाढून 37 टक्के झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
कॅस्परस्काय सेक्युरिटी नेटवर्कच्या (केएसएन) उत्पादनांनी देशातील स्थानिक ठिकाणी जानेवारी ते मार्चदरम्यान 5 कोटी 28 लाख 20 हजार 874 सायबर हल्ले झाल्याचे शोधून काढले. पहिल्या तिमाहीमध्ये भारत सायबर हल्ल्यात जगात 27 व्या क्रमांकावर पोहोचल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. यापूर्वी मागील वर्षाच्या चौथ्या तिमाहीत भारत हा 32 व्या क्रमांकावर होता. चालू तिमाहीतही सायबर हल्ल्याचे प्रमाण वाढेल, असा अंदाज कॅस्परस्कायच्या अहवालात करण्यात आला आहे.
हेही वाचा-'या' कंपनीत ३१९ कोटींच्या गुंतवणुकीनंतरही २००हून अधिक कर्मचाऱ्यांवर संक्रात
आशिया पॅसिफिक प्रदेशात सायबर गुन्हेगारांच्या हालचाली वाढल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती कॅस्परस्कायचे वरिष्ठ सुरक्षा संशोधक सौरभ शर्मा यांनी सांगितले. युएसबी ड्राई्ह, सीडी, डीव्हीडी अशा ऑफलाईन साधनांवर मालवेअरचे हल्ले वाढल्याचे दिसून आले आहे. अशा हल्ल्यापासून संरक्षणासाठी फायरवाल, अँटी रुटकिट फंक्शनलिटी आणि रिमुव्हेबल साधनांवर नियंत्रणाची गरज आहे.
हेही वाचा- विषमतेचे चित्र : अमेरिकेत लाखो बेरोजगार; अब्जाधीशांच्या संपत्तीत ४३४ अब्ज डॉलरची वाढ
डिजीटालयझेशन आणि इंटरनेटच्या वाढत्या वापराने स्मार्टफोनवरही हल्ले वाढल्याचे दिसून आल्याचे शर्मा यांनी सांगितले. यामध्ये डाटा लिकेज, असुरक्षित वायफाय नेटवर्क, स्पायवेअर, फिशिंग अॅटेक यांचा समावेश आहे. अशा गोष्टींपासून सुरक्षा मिळविल्यासाठी पायाभूत सुरक्षा बळकट करण्याची गरज असल्याचे कॅस्परस्कायचे महाव्यवस्थापक दिपेश कौरा यांनी सांगितले.
हेही वाचा-आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत टोमॅटो प्रति किलो फक्त 1 रुपया!