नवी दिल्ली – देशातंर्गत विमान सेवा तीन महिन्यानंतर 25 मे रोजी सुरू झाली. त्यानंतर 2.81 लाख प्रवाशांनी 25 ते 31 मे दरम्यान देशांतर्गत विमान सेवेने प्रवास केला आहे. ही आकडेवारी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए)दिली आहे.
गेली दोन महिने देशांतर्गत विमान सेवा बंद असल्याने जानेवारी ते मे 2020 दरम्यान प्रवाशांच्या संख्येत 43.4 टक्के घसरण झाली आहे. गतवर्षी मे 2019 दरम्यान देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांची 1.2 कोटी संख्या होती. कोरोना महामारीमुळे मर्यादित प्रमाणात मे महिन्यात विमान वाहतूक सुरू होती. त्यामुळे मे महिन्यात प्रवाशांची संख्या घटल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने 1.42 लाख प्रवाशांची 25 मे ते 31 मे दरम्यान वाहतूक केली आहे. या कालावधीत इंडिगोचा प्रवासी वाहतुकीत 50.6 हिस्सा राहिला आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने विमान प्रवासासाठी दोन आसनापैकी मधील आसनावरही प्रवाशांना बसण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विमान कंपन्यांना त्यांच्या क्षमतेच्या केवळ 30 टक्के वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.