नवी दिल्ली - पंजाब सरकारने आर्थिक संकटात असलेल्या वाहन चालकांना मोठा दिलासा दिला आहे. मिनी आणि स्कूल बससह सर्व मालवाहू वाहनांवरील वाहन कर पूर्णपणे (१०० टक्के ) माफ केल्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी जाहीर केले. ही कर माफी ३१ डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे.
पंजाबचे मुख्यंमत्री अमरिंदर सिंग यांनी खासगी वाहन चालकांच्या संघटनेची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीला वाहतूक मंत्री रझिया, राज्याचे अर्थमंत्री मनप्रीत बादल, वाहतूक सचिव के. शिवा प्रसाद आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी वाहतूक मंत्री रझिया सुलताना यांना खासगी मिनीबसचे प्रश्न पुढील आठवड्यापर्यंत सोडविण्याच्या सूचना केल्या आहेत.
पंजाब सरकारने वाहन कराच्या थकबाकीवरील व्याज आणि दंड ३१ मार्च २०२१ पर्यंत माफ केला आहे. या निर्णयामुळे पंजाब सरकारच्या तिजोरीला १०० कोटीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.