श्रीनगर - जम्मू काश्मीरमधून आजपर्यंत १०.७८ लाख मेट्रिक टन सफरचंद हे काश्मीर खोऱ्यामधून पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तर गेल्या वर्षी ११.७४ मेट्रिक टन सफरचंदाची खोऱ्यातून इतर ठिकाणी वाहतूक झाल्याची माहिती रोपवाटिका सचिव मनझूर अहमद लोणे यांनी दिली.
फळ वाहतुकीसाठी आजपर्यंत ७७ हजार ट्रकचा वापर झाल्याचे रोपवाटिका सचिव मनझूर अहमद लोणे यांनी सांगितले. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर फळ वाहतूक करणाऱ्या ट्रकला प्राधान्य देण्याची सूचना मुख्य सचिव बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी काश्मीरच्या विभागीय आयुक्तांना केली. नुकतेच हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
हेही वाचा-रेरा बाह्य गृहप्रकल्पांचाही 'त्या' योजनेत समावेश करावा- एफपीसीईची पंतप्रधानांना विनंती
केंद्र सरकारकडून सफरचंदाच्या उत्पादनासाठी विशेष पॅकेज (एमआयएसपी) देण्यात येते. सफरचंदाच्या ४.८५ लाख पेट्यांसाठी ३२ कोटी रुपये सरकारने दिल्याची सचिवांनी माहिती दिली. तर फळ उत्पादकांना सुमारे २६ कोटी रुपयांची मदत केल्याचे त्यांनी सांगितले. एमआयएसपी योजनेतील निधी वेगाने देण्यात यावा, अशी सूचनाही सुब्रमण्यम यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.
हेही वाचा-विदेशी गंगाजळीत ३.५१ अब्ज डॉलरची वाढ; आरबीआयची आकडेवारी
दरम्यान, सफरचंदाची विक्री ही जम्मू आणि काश्मीरच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देते.