परळी (बीड) - शहरात लसीकरण कार्यक्रम प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पूर्णपणे कोलमडला आहे. याचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना व वृद्धांना होत आहे. याच अनुषंगाने भाजपा कार्यकर्त्यांनी आज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांची भेट घेतली. तसेच लसीकरणाबाबत जाब विचारला.
शहरात केवळ 3 लसीकरण केंद्रे आहेत. कर्मचारी अपूर्ण आहेत. अशा परिस्थितीत शहरात लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. या ढिसाळपणामुळे नागरिकांना व वयोवृद्ध लोकांना तासनतास रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे.
यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत डॉ. मोरेंची भेट घेतली. प्रशासनाने तत्काळ लसीकरण केंद्रे वाढवून चांगले नियोजन करण्यात यावे, अशी मागणी केली. अन्यथा भाजप आक्रमक भूमिका घेईल व याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, अशा इशाराही भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिला.
यावेळी नगरसेवक प्रा. पवन मुंडे, अशविन मोगरकर, सचिन गित्ते, नरसिंन सिरसाठ, पवन मोदाणी, आनिश आग्रवाल, राजेद्र ओझा, मोहन जोशी, बाळासाहेब फड,दिलीप नेरकर, विशाल मुंडे, राजेश अघाव, गोविंद चौरे,शाम गित्ते, दिलीप नेरकर, नाना गित्ते, दिपक नागरगोजे, दिपक गित्ते, गडदे तुकाराम चैतन्य मुंडे, मस्के, आदी उपस्थित होते.