ETV Bharat / briefs

'या' कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प 2020 च्या निवडणुकीत होऊ शकतात पराभूत

अ‌ॅलन लिचमॅन हे अमेरिकेतील इतिहासकार असून त्यांनी वर्तवलेले भाकित या आठवड्याच्या न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झाले आहे. लिचमॅन हे वॉशिंग्टन डी. सी मधील ‘अमेरिकन युनिवर्व्हसीटी’मध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी तयार केलेल्या प्रतिमानानुसार ट्रम्प निवडणूकीत पराभूत होतील असा दावा केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प
author img

By

Published : Aug 9, 2020, 8:03 PM IST

Updated : Aug 9, 2020, 8:09 PM IST

नवी दिल्ली - अमेरिकेमध्ये येत्या काही दिवसांत अध्यक्षपदाच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट घातला आहे. कोरोनाची स्थिती हाताळण्यावरूनही ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. याबरोबरच मेल-इन वोटिंग( पोस्टाद्वारे मतदान) घेण्यासाठी ट्रम्प यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, यामुळे चुकीचे निकाल समोर येतील. या सगळ्यात खरा मुद्दा हा आहे की, ट्रम्प अपयशाला सामोरे जात आहेत, असे मत अमेरिकेतील एका विख्यात इतिहासकाराने व्यक्त केले आहे. मागील चार दशकांपासूच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे त्यांनी अचूक अंदाज वर्तवले आहेत.

'अ‌ॅलन लिचमॅन' असे या अमेरिकन इतिहासकाराचे नाव असून त्यांनी वर्तवलेले भाकीत या आठवड्याच्या 'न्यूयॉर्क टाईम्स'मध्ये प्रसिद्ध झाले आहे. लिचमॅन हे वॉशिंग्टन डी. सी मधील ‘अमेरिकन युनिवर्व्हसीटी’मध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी तयार केलेल्या प्रतिमानानुसार ट्रम्प निवडणूकीत पराभूत होतील, असा दावा केला आहे.

'द किज् टू द व्हाईट हाऊस' हे पुस्तक लिचमॅन यांनी लिहिले आहे. निवडणुकीचा अंदाज बांधण्यासाठी त्यांनी 13 ऐतिहासिक तथ्यांवर आधारित प्रतिमान तयार केले आहे. या मॉडेलनुसार त्यांनी 1980 पासून अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांचा अंदाज बांधला आहे. अनेक निवडणूकपूर्व चाचण्यांच्या विसंगत असे भाकीत त्यांनी वर्तवले होते आणि ते खरेदेखील ठरले होते.

फायनान्शिअल टाईम्सच्या अंदाजानुसार डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांना एकूण 538 पैकी 308 मते मिळतील तर ट्रम्प यांना फक्त 113 मते मिळतील. उमेदवाराला विजयी होण्यासाठी 270 मतांची गरज आहे. त्यामुळे या चाचणीतून निकाल बिडेन यांच्या बाजूने झुकत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, या चाचणीतून सहभागी नसलेल्या जनतेचे(सायलेंट वोटर) मत समोर येत नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. लिचमॅन यांच्या मॉडेलनुसार टॅम्प नक्कीच पराभूत होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

काय आहे लिचमॅन यांचे किज् मॉडेल?

या मॉडेलमध्ये 13 ऐतिहासिक मुद्द्यांचा समावेश आहे. मध्यावधीतील फायदे, नो कॉन्टेस्ट(कोणतीही स्पर्धा नाही, सत्ता, तिसरा पक्ष नाही, मजबूत अल्पकालीन अर्थव्यवस्था, मजबूत दीर्घकालीन अर्थव्यवस्था, मोठा धोरणातील बदल, घोटाळे नाही, लष्करी/परकीय अपयश नाही, परदेशात लष्कराला यश, देशात सामाजिक अस्थिरता नाही, सत्ताधारी व्यक्तीचा करिश्मा, करिश्मा नसलेला प्रतिस्पर्धी. या 13 मुद्द्यांवर लिचमॅन यांचे प्रतिमान आधारित आहे.

‘हो’ किंवा ‘नाही’ मध्ये या प्रत्येक मुद्द्यावर उत्तर दिले आणि जर 6 मुद्दयांवर उत्तर चुकीचे म्हणजे नाही असे आले, तर उमेदवार पराभूत होणार असे समजावे. असे या मॉडेलमध्ये लिचमॅन यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि बिडेन यांचा विचार करता, ट्रम्प यांच्या बाजूने 7 मुद्द्यांवर नकारात्मक उत्तर येते. हे मुद्दे बिडेन यांच्या कलाने झुकू शकतात. त्यामुळे डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बिडेन यांच्या बाजूने कल असल्याचे लिचमॅन यांचे म्हणणे आहे.

लिचमॅन यांच्या मतानुसार राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणूक अभियानाचा काहीही प्रभाव पडत नाही. त्यांचे मॉ़डेल सत्तेत असलेल्या नेत्याच्या कारभाराचे परिक्षण करते, असे रोबिंद्र सचदेव यांचे म्हणणे आहे. सचदेव हे अमेरिकन विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून ते अमेरिका भारत पॉलिटिकल अ‌ॅक्शन कमिटीचे संस्थापक आहेत. त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी याबद्दल चर्चा केली.

जर सत्तेतील नेत्याने मॉडेलमधील मुद्द्यांवर सकारात्मक गुण मिळवले, तर पक्षाची व्हाईट हाऊसवर सत्ता शाबूत राहील. जर पक्षाची कामगिरी सुमार असेल तर तो पक्ष पराभूत होईल, असे लिचमॅन यांचे मॉडेल सांगते, असे सचदेव यांनी सांगितले.

लिचमॅन हे स्वत: इतिहासाचे प्राध्यापक असल्याने त्यांचा अमेरिकेच्या इतिहासाचा, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवणुकांचा आणि राजकीय घडामोडींचा मोठा अभ्यास आहे. तसेच निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे त्यांनी शोधून काढले आहेत. या मुद्द्यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकींवर इतिहासात, वर्तमानात आणि भविष्यात काय परिणाम झाला आणि होईल याचा त्यांचा अभ्यास आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणते ट्रेन्ड असतात, ते ओळखून त्यासंबंधी माहिती जमा करून त्याचे विश्लेषण लिचमॅन यांना व्यवस्थित करता येत असावे, असे सचदेव यांनी सांगितले.

लिचमॅन हे स्वत: डेमोक्रटिक पक्षाचे नेते असून 2016 साली त्यांनी ट्रम्प यांच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. अनेक चाचण्या आणि भाकिते विसंगत असतानाही त्यांचा अंदाज खरा ठरला होता. त्यामुळे लिचमॅन यांना गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे सचदेव म्हणाले.

Last Updated : Aug 9, 2020, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.