सांगली : जिल्ह्याला विजेच्या कडकडाटसह अवकाळी पावसाने झोडपून काढले. सांगली शहरासह ग्रामीण भागात जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. दुष्काळी जत तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली.
घरांचे पत्रे उडाले
रविवारी सांगली जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. दुष्काळी जत तालुक्यात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. अनके ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेल्याची घटना घडली. तर सांयकाळ नंतर सांगली शहरासह अनेक भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला.
शेतकऱ्यांचे नुकसान
शहरात दुपारपासून उन्हाची मोठी तीव्रता जाणवत होती. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा मिळाला. तर या अवकाळी पाऊसाने द्राक्ष बाग आणि बेदाणा निर्मितीला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.