ETV Bharat / briefs

गडचिरोलीत पोलीस-नक्षलवादी चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान - Naxalite killed in gadchiroli news

पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे झारेवाडा-गोरगुट्टा या परिसरात नक्षलवाद्यांचे वास्तव्य असल्याची माहिती मिळाली.

Two naxalite killed in gadchiroli
दोन नक्षलवाद्यांना कंठस्थान
author img

By

Published : Apr 28, 2021, 2:25 PM IST

Updated : Apr 28, 2021, 2:41 PM IST

गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील पोलीस मदतकेंद्र गट्टा अंतर्गत झारेवाडा गोरगुट्टा जंगल परिसरात बुधवारी सकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवादी मारले गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे झारेवाडा-गोरगुट्टा या परिसरात नक्षलवाद्यांचे वास्तव्य असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोध अभियान राबविण्यास सुरुवात केली. अभियान राबवित असताना सकाळी सात ते सव्वा सात वाजताच्या दरम्यान गोरगुट्टा जंगलात असलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस अभियान पथकाची चाहूल लागताच गोळीबार सुरू केला.

प्रत्युत्तरात पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने मारा केला. ही चकमक जवळ जवळ अर्धा तास चालली होती. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. चकमकीनंतर पोलिसांनी परिसराचा शोध घेतला असता, त्यांना दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले. पोलिसांची शोधमोहीम अजुनही सुरू आहे.

Last Updated : Apr 28, 2021, 2:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.