ETV Bharat / briefs

COVID -19 : नांदेडात एकाच दिवसात कोरोनाचे 23 नवीन रुग्ण - corona news nanded

बुधवारी पहिल्यांदा कोरोनाबाधित 23 रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आणखी काही जणांचे अहवाल प्रलंबित असून हे अहवाल लवकरच प्रशासनाला प्राप्त होणार आहे. देगलूरनाका आणि नईआबादी भाग हा प्रशासनाने कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केला असला तरी या ठिकाणी नागरिकांची वर्दळ नेहमीच सुरु आहे.

nanded corone news
twenty three new corona patients at nanded
author img

By

Published : Jun 3, 2020, 7:33 PM IST

नांदेड - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी २३ नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनासोबतत नांदेडकरांचीही झोप उडाली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 175 वर पोहचली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत 126 कोरोनाबाधित रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये फक्त 20 रुग्णांवर उपचार सुरु होते.

बुधवार हा दिवस प्रशासनासमोर कोरोनाचे नवे वादळ घेवून आला. सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात इतवारा भागातील १ महिला आणि मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील १ युवक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. मात्र, दुपारी मात्र २१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तीन दिवसांपूर्वी नईआबादी येथील १ जण तर देगलूर नाका भागातील १ डॉक्टर आणि त्यांचा सेवक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. प्रशासनाने डॉक्टर आणि सेवक तसेच नईआबादी भागातील संबंधीत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या नातेवाईक व संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल बुधवारी दुपारी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. 132 अहवालांपैकी 21 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले. तर 99 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 6 जणांचे अनिर्णित तर 6 जणांचे अहवाल नाकारण्यात आले आहेत. 21 पैकी 11 कोरोनाबाधित रुग्ण देगलूरनाका भागातील आहेत.

कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबातील व तसेच नातेवाईक आहेत. तसेच 9 जण नईआबादी भागातील कोरोनाबाधित कुटुंबातील आहेत. 1 रुग्ण आदमपूर ता. देगलूर येथील असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी पहिल्यांदा कोरोनाबाधित 23 रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आणखी काही जणांचे अहवाल प्रलंबित असून हे अहवाल लवकरच प्रशासनाला प्राप्त होणार आहे. देगलूरनाका आणि नईआबादी भाग हा प्रशासनाने कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केला असला तरी या ठिकाणी नागरिकांची वर्दळ नेहमीच सुरु आहे.

याभागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करणे आवश्यक आहे. नईआबादी आणि देगलूरनाका भागात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. नईआबादी भागात नागरिक सोशल डिस्टन्सचे पालन न करता तसेच तोंडाला मास्क न लावता सर्रासपणे एकत्र बसत आहेत. कन्टेनमेंट झोनमध्ये प्रशासनाने नियमांची कठोर अंमलबजावणी करुन प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यासाठी व येण्यासाठी मनाई करावी, अशी मागणी होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.