कोल्हापूर - जिल्ह्यात एकीकडे पुन्हा रुग्णांची वाढत असल्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, आज (शुक्रवार) सकाळी 10 वाजल्यापासून एकही नवीन रुग्णाची वाढ झाली नाहीये. तर, दिलासादायक बाब म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील 10 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील एकूण 708 रुग्णांपैकी 611 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 89 झाली आहे.
आज रात्री 8 वाजेपर्यंत सीपीआर प्रशासनाला प्राप्त झालेल्या 159 अहवालापैकी 158 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल प्रलंबित आहे. आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
आजरा - 74, भुदरगड - 70, चंदगड - 74, गडहिंग्लज - 81, गगनबावडा - 6, हातकणंगले - 9, कागल - 57, करवीर - 19, पन्हाळा - 27, राधानगरी - 64, शाहुवाडी - 176, शिरोळ - 7, नगरपरिषद क्षेत्र - 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र -25 असे एकूण 700 आणि पुणे -1, सोलापूर -3, मुंबई -1, कर्नाटक - 2 आणि आंध्रप्रदेश -1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 708 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 708 रुग्णांपैकी 611 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 89 इतकी आहे.