मुंबई - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या ताफ्यातील दोन सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
पर्यावरण व वन्यप्राण्यांचे अभ्यासक असलेले तेजस ठाकरे यांना विशेष सुरक्षा आहे. त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील दोन सुरक्षा रक्षक कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र याबाबत शिवसेनेकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, यापूर्वीही मातोश्री बाहेरील सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते.