मुंबई - इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत खूपच मजबूत संघ वाटत आहे. दिग्गज खेळाडू विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हा संघ या स्पर्धेत उतरणार आहे. अंतिम ४ संघात जागा मिळवण्यात हा संघ यशस्वी होईल. भारतीय संघात संतुलन आणि फॉर्म याबाबतीत विचार केल्यास हा संघ सेमीफायनलपर्यंत सहज मजल मारेल, अशी भविष्यवाणी श्रीलंकेचा माजी गोलंदाज चमिंडा वास यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारत जरी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत हरला असला तरी विश्वचषकचा किताब जिंकण्यात भारताला यश येईल असे वास याला वाटते. वास पत्रकारांशी पुढे बोलताना म्हणाला की, मागील दोन-तीन वर्षात भारतीय संघाने दबदबा तयार केला आहे. त्यांच्याकडे उत्तम वेगवान गोलंदाज आहेत. ते चांगली कामगिरी करतील. भारत सेमीफायनलपर्यंत पोहचेल ही माझी भविष्य वाणी आहे.
डाव्या हाताने गोलंदाजी करणारे वासने श्रीलंकाची कामगिरी लसिथ मलिंगाच्या प्रदर्शनावर अवलंबून आहे. मलिंगा जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज असल्याचे वासने सांगितले.
भारतीय संघाने २०११ साली झालेल्या विश्वचषकात महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. २०१५ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. मात्र, सेमीफायनलमध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करत विश्वचषकावर नाव कोरले होते.