ETV Bharat / briefs

विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा : खासदार संभाजीराजे - प्रल्हाद सिंह पटेल बातमी

विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची भेट घेतली.

विजयदुर्ग किल्ला
विजयदुर्ग किल्ला
author img

By

Published : Aug 7, 2020, 4:42 PM IST

सिंधुदुर्ग : विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात याव्या, यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली. यावेळी किल्ल्याची तत्काळ दुरुस्ती करण्यासाठी लेखी पत्र दिले. या बैठकीमध्ये स्वराज्यात आरमाराचे व समुद्री किल्ल्यांचे महत्व सांगून हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत अशी मागणी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. मंत्री, पटेल यांनी तातडीने केंद्रीय पुरातत्व खात्याला एस्टीमेट तयार करण्याचे आदेश दिले असल्याचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्र्यांची बेत घेतल्यानंतर सोशल मीडियावरून युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी माहिती दिली. ते म्हणतात, पावसाळा संपताच पुनर्बांधणीचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आवश्यक आहेत त्या सर्व कागदोपत्री परवानग्या आठवडाभरात पूर्ण झाल्या पाहिजेत अशी सूचना सुद्धा मंत्री पटेल यांनी केल्या. आजची बैठक अत्यंत सकारात्मक झाली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे सर्व शिवभक्तांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य आणि शिवभक्तांच्या भावनांचा आदर करीत तत्काळ निर्णय घेतले.

विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे. अतिवृष्टीमुळे विजयदुर्गची भिंत कोसळली आहे. कोसळलेली भिंत हि बुरुजाला संरक्षण देण्यासाठी उभारण्यात आली होती. मात्र, हीच भिंत कोसळली असल्याने या शिवकालीन किल्ल्याला धोका पोहोचणार आहे. यापुर्वीच समुद्रातील एक बुरुज खालून पोखरला असल्याने या बुरुजाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू आहे. यातच हा नवीन बुरुज ढासळल्याने या किल्ल्याच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मराठी साम्राज्याचे सरखेल कान्होजी आंग्रे यांचीही दक्षिणेकडील आरमारी राजधानी होती. या किल्ल्याने तब्बल १३ लढाया घनघोरपणे लढल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे देणार किल्याला भेट

दरम्यान भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे हे ८ ऑगष्टरोजी किल्याला भेट देणार आहेत. या किल्याच्या संवर्धनासाठी आमदार नितेश राणे, खासदार नारायण राणे यांच्याही माध्यमातून केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष रवी पाळेकर यांनी सांगितले. ते देवगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.