ETV Bharat / briefs

रोजा असतानाही 'ते' मैदानात उतरले, शिखर धवनने केले कौतुक

आज शुक्रवारी दिल्लीचा दुसरा क्वॉलिफायर सामना चेन्नईशी होणार आहे.

शिखर धवनसोबत राशिद आणि नबी
author img

By

Published : May 10, 2019, 1:23 PM IST

विशाखापट्टणम - दिल्ली कॅपिटल्स संघाचा अनुभवी खेळाडू शिखर धवनने हैदराबाद संघातील मोहम्मद नबी आणि राशिद खान यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे या काळात मुस्लीम समाजबांधवाचा रोजा असतो. त्याप्रमाणे राशिद-नबी यांचाही रोजा असतानाही ते सामना खेळण्यासाठी बुधवारी मैदानात उतरले. हे ऐकून धवन खूपच खूश झाला आणि दोघांचेही कौतुक केले.

धवन म्हणाला की, रोजा असताना सामना खेळणे खूप अवघड आहे. तरीही हे दोन धुरंदर सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आणि सामन्यात चांगली कामगिरी केली. सामना संपल्यानतंर धवनने त्याच्या जुन्या सहकारी मित्रांची भेट घेतली. त्यांच्याशी एक फोटो काढून तो ट्वीटवर पोस्टही केला.

फोटोला कॅप्शन देत धवनने लिहिले की, रोजा करुन मॅचसाठी मैदानात उतरणे हे शक्य नसते, तरही या दोघांनी शक्य करुन दाखविले. या दोघांचा आम्हाला अभिमान आहे. यांची ऊर्जा प्रत्येकाला मोठी स्वप्न पाहण्यासाठी प्रोत्साहित करेल. अल्लाह नेहमी यांच्या पाठीशी आहे.

बुधवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने हैदराबादचा २ गडी राखून शेवटच्या षटकात पराभव केला. त्यामुळे हैदराबादचा संघ आयपीएलमधून बाहेर पडला. आज शुक्रवारी दिल्लीचा दुसरा क्वॉलिफायर सामना चेन्नईशी होणार आहे.

Intro:Body:

Spo 08

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.