नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि नाशिकमध्ये दारुची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, घरपोहच दारु देण्यास वाईन मर्चंट्स असोशिएशनने विरोध दर्शवला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालायने दारुची होम डिलिव्हरी करण्याविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.
'आम्हाला ही याचिका ऐकून घेण्यास कोणताही रस नाही. मद्य अत्यावश्यक वस्तू नाही. त्यामुळे त्यावर आम्ही तत्काळ आदेश का देऊ? असे न्यायमूर्ती ए. एम खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने निर्णय दिला. तसेच याचिका सुनावणीस पीठाने नकार दिला.
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने यावर्षी मे महिन्यात नियम आणि सुरक्षेची काळजी घेत नाशिक आणि पुण्यात घरपोहच मद्य देण्यास परवानगी दिली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे.