मुंबई - बंगालमध्ये एक हाती सत्ता मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, नंदीग्राम येथून ममता बॅनर्जी यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
बंगालमध्ये विधानपरिषद नाही, त्यामुळे त्या शपथ घेऊ शकत नाहीत, असे विरोधकांकडून सांगितल्या जात आहे. आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी ममता दीदींची पाठराखण केली आहे. त्या हरल्या म्हणून काय झाले. ममता दीदींना बंगालच्या जनतेने स्विकारले आहे. त्यामुळे त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
आमच्या ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. हा विजय केवळ त्यांचा आहे. त्यांच्यासमोर मोठी फौज होती. त्या सर्वांना त्यांनी भूईसपाट केले आहे. त्यामुळे हा निव्वळ त्यांचा विजय असून आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत, असे संजय राऊत म्हणाले.
त्रिपुराचे मुख्यमंत्री, डावे कोण काय बोलत म्हणून ममता यांना थांबवता येणार नाही. ममता या नंदीगाममधून हरल्या हे खरे आहे. मात्र, हरलेले देखील मंत्री आणि केंद्रीय मंत्री झाल्याचा इतिहास आहे. स्मृती इराणी यादेखील निवडणुका हरल्या होत्या. मात्र, त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले होते.
महाराष्ट्रातदेखील माजी पंतप्रधान मोराजी देसाई विधानसभा निवडणूक हरले होते. तरीदेखील त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ममता दीदीच्या नावाने बंगालमध्ये वादळ आले आणि सर्व बंगालच्या खाडीत बुडाले. ममता शपथ घेण्याचा सपूर्ण अधिकार आहे. लोकांनी त्यांच्याच नावावर मतदान केले आहे.
बंगालमधील हिंसा चिंताजनक आहे. मात्र, तिथे सध्या ममता बॅनर्जी यांचं राज्य नाही.आजपर्यत राज्यपाल शासन होत. आता शपथ घेतल्यावर त्यांचा कारभार सुरू होईल.