चंद्रपूर - पेट्रोल भरलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या हायवा ट्रकला धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, या अपघातामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना महाकाली कॉलनीजवळ बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावर घडली.
बल्लारशाहवरून हाईवा ट्रक (ए मएच 34 एबी 6154) बंगाली कॅम्पमार्गे जात होता. याच वेळी विरुद्ध दिशेने येणारा पेट्रोल टँकर (एमएच 34 बीजी 8787) याने हायवा ट्रकला जोरदार धडक दिली. टँकरचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. या घटनेत दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गावर अनेक अपघात घडले आहे. यात काहींचा जीवसुद्धा गेला आहे. त्यामुळे येथे वाहतूक नियंत्रणासाठीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या घटनेत सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अन्यथा पेट्रोल टँकरने पेट घेतला असता तर मोठी जीवितहानी झाली असती.