ETV Bharat / briefs

औरंगाबाद : हुंडा घेऊन लग्नाला नकार; पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल - Refuse marriage after taking dowry

हुंडा म्हणून दोन लाख रुपये रोख स्वरुपात मुलीच्या वडिलांकडून घेतले. तसेच दुचाकी घेण्यासाठीही ५० हजार रुपये घेतले.

Mukundwadi police station
मूकुंद वाडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Apr 27, 2021, 3:41 PM IST

औरंंगाबाद - मुलीच्या आईवडीलांना विश्वासात घेऊन मुलीचा साखरपुडा करण्यास भाग पाडत हुंडा, दुचाकीसाठी असे चार लाख रुपये उकळले. त्यानंतर मुलीशी लग्न करण्यास नकार दिल्याचा प्रकार उघडकीस आला.

२१ वर्षीय तरूणीच्या तक्रारी -

याप्रकरणी २१ वर्षीय तरूणीच्या तक्रारी वरून रविवारी (ता. २५) मुकूंदवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित अनिल छगन राठोड, त्याचे वडील जगन भिमा राठोड, अनिलची आई, तसेच मध्यस्थी करणारे रमेश राठोड, सुनील राठोड यांनी फिर्यादी मुलीच्या आईवडिलांना विश्वासात घेऊन लग्नाचा साखरपुडा केला. दरम्यान, हुंडा म्हणून दोन लाख रुपये रोख स्वरुपात मुलीच्या वडिलांकडून घेतले. तसेच दुचाकी घेण्यासाठीही ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर लग्नासाठी आणखी पैशाची मागणी केली करत फिर्यादी मुलीच्या आई-वडिलांना एकून चार लाख रुपये खर्च करण्यास लावले.

ऐनवेळी लग्न करण्यास नकार -

ऐनवेळी लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी फिर्यादी मुलगी तसेच तिचे आईवडील यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी हुंडा प्रतिबंधक अधिनियमानुसार मुकूंदवाडी पोलीस ठाण्यात संशयित होणारा पती अनिल छगन राठोड, त्याचे आईवडील यांच्यासह मध्यस्थी करणारे रमेश राठोड, सुनील राठोड यांच्याविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.