ETV Bharat / briefs

२०१९ च्या निवडणुकीवर 'माझा बहिष्कार'...अमरावतीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा निर्णय

अमरावती जिल्ह्यात ४४ प्रकल्प उभारले गेले. यासाठी सर्व जमिनी बळजबरी अधिग्रहित केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. मात्र, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार शासनाने केला. अनेकदा आंदोलने केली मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत.

नागरिकांनी बहिष्काराचे पोस्टर घराच्या दारावर लावले आहेत
author img

By

Published : Apr 4, 2019, 2:43 PM IST

अमरावती - अधिग्रहित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने अमरावतीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पग्रस्तांची संख्या १ लाख ३५ हजार असल्याचे सांगितले जात आहे. चांदुरबाजार तालुक्यातील तळेगाव मोहना येथे प्रकल्पग्रस्तांनी सभा घेतली. यात बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाने आश्वासन दिल्यास विचार करु असे प्रकल्पग्रस्तांनी म्हटले आहे

अमरावती जिल्ह्यात ४४ प्रकल्प उभारले गेले. यासाठी सर्व जमिनी बळजबरी अधिग्रहित केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. मात्र, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार शासनाने केला. अनेकदा आंदोलने केली मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळेच बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हा निर्णय प्रशासनाला निवेदनाद्वारे कळविण्यात आला आहे.

या आहेत मागण्या -
सन २००० ते डिसेंबर २०१३ या काळात घेतलेल्या जमिनीसाठी वाढीव मोबदला देण्यात यावा. महाराष्ट्र शासन पुनर्वसन कायदा २०१३ नुसार विस्थापितांना न्याय द्यावा. शासकीय सेवेत सामावून घेण्याची कायदेशीर तरतूद ५ वरून १५ टक्के करावी. नोकरी देणे शक्य नसल्यास एकरी २० लाख रुपये एकरकमी मिळावे. २४ एप्रिल २०१७ च्या अधिसूचनेप्रमाणे सर्व प्रकरणात पूर्वलक्षी प्रभावाने गुणांक २ लावून मोबदला निश्चित करावा व फरकाची रक्कम अदा करण्यात यावी. पुनर्वसित गावातील सर्व प्रकल्पग्रस्तांना टप्प्याऐवजी एकाचवेळी आवास योजनेचा विशेष लाभ देण्यात यावा.

पश्चिम विदर्भातील प्रकल्पांकरीता ६ हजार हेक्टर जमीन कायद्याचा धाक दाखवून सरळ खरेदीने घेण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ४ हजार हेक्टर जमीन अमरावती जिल्ह्यातील आहे. तर २ हजार हेक्टर इतर जिल्ह्यांतील आहे. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. सरकारकडे अनेकदा या संदर्भात निवेदने व आंदोलन केलीत. मात्र या समस्येवर सरकारने दुर्लक्ष केले असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Intro:अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आक्रमक पवित्रा

१लाख ३५हजार प्रकल्पग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

तळेगाव मोहना येथे निषेध सभा;
घरासमोर लावले बहिष्काराचे बॅनर
--------------------------------------------
अँकर अमर
शेतीचा योग्य मोहबदला व शासकीय नौकरी देऊ हे सांगत शासनाने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी हस्तगत केल्या मात्र यात अमरावती जिल्ह्यात ४४ प्रकल्प उभारले गेले मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार शासनाने केला,अनेकदा आंदोलने केलीत मात्र प्रकल्प शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्याने अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतदारावर बहिष्कार टाकला असून बुधवारी चांदुरबाजार तालुक्यातील तळेगाव मोहना येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी निषेध सभा घेत आपली भूमिका स्पष्ट केली यात १ लाख ३५ हजार प्रकल्पग्रस्त शेतकरी मतदानावर बहिष्कार टाकणार आहे,याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासनाला निवेदनात द्वारे कळविले आहे

Vo-1
सन २००० ते डिसेंबर २०१३ या काळात घेतलेल्या जमिनीसाठी वाढीव मोबदला. महाराष्ट्र शासन पुनर्वसन कायदा २०१३ नुसार विस्थापितांना न्याय. शासकीय सेवेत सामावून घेण्याची कायदेशीर तरतूद ५ वरून १५ टक्के करावी. नोकरी देणे शक्य नसल्यास एकरी २० लाख रुपये एकरकमी मिळावे. २४ एप्रिल २०१७ च्या अधिसूचनेप्रमाणे सर्व प्रकरणात पूर्वलक्षी प्रभावाने गुणांक २ लावून मोबदला निश्चित करावा व फरकाची रक्कम अदा करण्यात यावी. पुनर्वसित गावांतील सर्व प्रकल्पग्रस्तांना टप्प्याऐवजी एकाचवेळी आवास योजनेचा विशेष लाभ.पश्चिम विदर्भातील प्रकल्पांकरिता सहा हजार हेक्टर जमीन कायद्याचा धाक दाखवून सरळ खरेदीने घेण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक चार हजार हेक्टर जमीन अमरावती जिल्ह्यातील आहे, तर दोन हजार हेक्टर इतर जिल्ह्यांतील आहे.या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत सरकारकडे अनेकदा या संदर्भात निवेदने व आंदोलन केलीत मात्र या समस्येवर सरकारने दुर्लक्ष केल्या गेले, या ठिकाणी असलेले
अनेक प्रकल्प अपूर्ण व निर्माणाधीन आहे, अमरावती जिल्हात एकूण४४प्रकल्प उभारल्या गेले आहेत मात्र ते अपूर्ण आहेत,अमरावती जिल्ह्यात प्रकल्पग्रस्ताचे 1 लाख35हजार मतदार आहेत तर जिल्हातील३००गावात प्रकल्पग्रस्त राहतात मात्र शासनाने मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने तळेगाव मोहना येथे प्रकल्पग्रस्तांनी निषेध सभा घेतली अमरावती लोकसभा मतदारसंघातील एकही प्रकल्पग्रस्त मतदान करणार नसून या निवडणुकीत बहिष्कार टाकण्यात येणार आहे

बाईट-प्रकल्पग्रस्त

तर प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या घरासमोर मतदानावर बहिष्कार टाकण्याबाबद बॅनर लावन्यात आले आहे तर आम्ही निवडणूकीवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती यांना देण्यात आले आहे, मात्र शासनाने अद्यापही प्रकल्पग्रस्तांच्या निवेदनाची दखल घेतली नाही,त्यामुळे गावा गावात जाऊन प्रकल्पग्रस्त शेतकरी मतदानावर बहिष्कार टाकण्याबाबद सभा घेणार आहे त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.