ETV Bharat / briefs

धक्कादायक! जळगावात वापरलेल्या मास्कपासून चक्क बनवल्या गाद्या - जळगाव गादी कोरोना न्युज

जळगावमध्ये झोपण्याच्या गादीत वापरलेले मास्क घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Mask
Jalgaon
author img

By

Published : Apr 11, 2021, 9:01 PM IST

Updated : Apr 12, 2021, 5:14 PM IST

जळगाव : कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांनी वापरलेल्या मास्कचा वापर झोपण्याची गादी बनवण्यासाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील कुसूंबा नाका परिसरातील 'महाराष्ट्र गादी भांडार' येथे हा प्रकार घडला आहे. गादी बनविण्यासाठी चक्क लोकांनी वापरलेल्या मास्कचा या ठिकाणी वापर होत असल्याचे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गादी कारखान्याचा मालक अमजद अहमद मन्सुरी (रा. आझादनगर, जळगाव) यास अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे सगळा प्रकार?

कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी नागरिकांनी मास्क वापरण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी वापरलेल्या मास्कचा वापर करुन कुसूंबा नाक्याजवळ हॉटेल कृष्णा गार्डनच्या मागे महाराष्ट्र गादी भांडार येथे गादी बनविण्यात येत असल्याची माहिती कुसूंबा येथील पोलीस पाटील राधेश्याम चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर, शांताराम पाटील यांनी महाराष्ट्र गादी भांडार गाठले. याठिकाणी त्यांनी पाहणी केली असता, नागरिकांनी वापरलेल्या मास्कपासून गादी बनविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापरलेले मास्क पडलेले दिसून आले.

गादी कारखाना मालक अटक

याबाबत गादी भांडारचे मालक अमजद अहमद मन्सुरी यास विचारले असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपली चूक कबूल केली. त्यानंतर अमजद मन्सुरी यास पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात कोरोनाचा संसर्ग वाढवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी सिद्धेश्वर वडापकर यांनी फिर्यादी दिली.

Last Updated : Apr 12, 2021, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.