ETV Bharat / briefs

बारामतीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका - Social distance rule break baramati

गृहोपयोगी व शेती उपयोगी वस्तू खरेदीबरोबरच शासकीय कार्यालयात नागरिक निष्काळजीपणे ठिकठिकाणी सामाजिक अंतर न ठेवता गर्दी करताना दिसून येतात. तसेच दारू विक्रीच्या दुकानांमध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना मनाई असतानाही गर्दी होत आहे. त्यामुळे तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Social distance baramati
Social distance baramati
author img

By

Published : Jul 9, 2020, 4:37 PM IST

पुणे- अखंड मानवजातीला कोरोना आजाराने धडकी भरवली आहे. शासन, प्रशासनाकडून कोरोनावर मात करण्यासह कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मात्र बारामतीत कोरोना संबंधीच्या नियमांचे उल्लंघन करत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला हरताळ फासत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

देशासह राज्यात ठिकठिकाणी कोरोना सारख्या महामारीचा प्रादुर्भाव वाढत होता. त्यावेळी अवघ्या काही दिवसातच बारामती 'कोरोना मुक्त' झाली होती. मात्र काही बेफिकीर नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे शहरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. अशा निष्काळजी व बेफिक्रीमुळे बारामतीत एकाच दिवशी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत बारामतीत 36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 22 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत कोरोनाने 4 बारामतीकरांचा बळी घेतला आहे.

असे असतानाही शहरात व्यापारी व नागरिकांकडून टाळे बंदीच्या नियमांचे कठोर पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने दुकाने चालू ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यापैकी दुकानात सामाजिक अंतर राखले जावे, थर्मल स्कॅनिंग मशीन ठेवणे, ग्राहकांची नोंद घेण्यासाठी रजिस्टर ठेवणे या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे.

तसेच गृहोपयोगी व शेती उपयोगी वस्तू खरेदीबरोबरच शासकीय कार्यालयात नागरिक निष्काळजीपणे ठिकठिकाणी सामाजिक अंतर न ठेवता गर्दी करताना दिसून येतात. तसेच दारू विक्रीच्या दुकानांमध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना मनाई असतानाही गर्दी होत आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.