मुंबई - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी विश्वकरंडकासाठी संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व सर्फराज अहमद याच्या खांद्यावर देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याच्यासोबत वहाब रियाज आणि आसिफ अली यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
आबिद अली, फहीम अशरफ आणि जुनैद खान यांच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. निवड समितीचे प्रमुख इंजमाम उल हकने गद्दाफ्टी स्टेडियममध्ये ही घोषणा केली.
नव्या संघात ३३ वर्षीय डाव्या हाताने गोलंदाजी करणारा वहाब रियाजचे नाव साऱ्यांनाच आश्चर्य चकित करणारे ठरले. त्याचे दोन वर्षानंतर पुनरागमन झाले आहे. पाकिस्तान कडून ७९ सामन्यात १०२ गडी बाद केले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याने भारताविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.
वहाब रियाज २०११ आणि २०१५ च्या विश्वकरंडकात पाकिस्तानच्या संघात सदस्य होता. त्याने १२ सामन्यात २४ गडी बाद केले आहेत. त्यात ४६ धावा देत त्याने ५ गडी बाद केले आहेत.
पाकिस्तानचा २०१७ नंतरच्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर चमकदार कामगिरी करता आली नाही. नुकतेच त्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५-०, त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून २-३ पराभव झाला होता. न्यूझीलंडविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली. त्यानंतर पाकिस्तानचा संघ एशिया कप स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंतही पोहचला नव्हता. नुकतेच इंग्लंडने ४-० ने पाकिस्तानला पराभूत केले होते.
विश्वकरंडकासाठी पाकिस्तानचा संघ
सर्फराज अहमद (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, इमाम उल हक, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, शादाब खान, शोएब मलिक आणि वहाब रियाज.