जळगाव- जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी दोनशेहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्हा प्रशासनाला आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये तब्बल 207 नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 5 हजार 10 इतकी झाली आहे.
जिल्हा प्रशासनाला आज प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये सर्वाधिक 39 पॉझिटिव्ह रुग्ण हे अमळनेर शहर आणि तालुक्यात आढळले आहेत. त्या खालोखाल 30 रुग्ण हे रावेरात आढळले आहेत. धरणगाव आणि जळगावातही अनुक्रमे 23 व 22 नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 22, जळगाव ग्रामीण 7, भुसावळ 8, अमळनेर 39, चोपडा 18, पाचोरा 10, भडगाव 1, धरणगाव 23, यावल 2, एरंडोल 18, जामनेर 1, रावेर 30, पारोळा 1, चाळीसगाव 3, मुक्ताईनगर 16 आणि बोदवडच्या 6 रुग्णांचा समावेश आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील एका रुग्णाचा देखील त्यात समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 2 हजार 983 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 1 हजार 726 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 214 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी दिवसभरात 155 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.
बुधवारी 8 बाधितांचा मृत्यू
आज जिल्ह्यातील 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात जळगाव शहरातील 60 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, जळगाव तालुक्यातील 60 वर्षीय महिला, रावेर तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, भुसावळ तालुक्यातील 74 वर्षीय पुरुष, धरणगाव तालुक्यातील 73 वर्षीय पुरुष, भडगाव तालुक्यातील 70 वर्षीय महिला तर मुक्ताईनगर तालुक्यातील 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
कोरोना अपडेट
जळगाव शहर 1117
जळगाव ग्रामीण 205
भुसावळ 498
अमळनेर 431
चोपडा 339
पाचोरा 117
भडगाव 260
धरणगाव 225
यावल 284
एरंडोल 256
जामनेर 250
रावेर 380
पारोळा 287
चाळीसगाव 96
मुक्ताईनगर 97
बोदवड 152
एकूण रुग्णसंख्या 5010