दिल्ली - अलीकडील आर्थिक विकासात होणाऱ्या घसरणी नंतरही भारत देश हा पुढील कित्येक दशके जगातील आघाडीचा वस्तू उत्पादन आणि सेवा केंद्र देणारा म्हणून गणला जाईल, असे देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी म्हटले आहे. आताच्या या काळात भारतावर बिनदिक्कत विश्वास ठेवा आणि गुंतवणूक करा, असे अदानी यांनी म्हटले आहे.
भारताची 2019-20 ची आर्थिक विकासदर 4.2 टक्क्यांपर्यंत खाली आला असून तो जवळजवळ दशकभरातील सर्वात कमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सींनीही कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे चालू आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपी कमी होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
अदानी गॅस लिमिटेडच्या आपल्या वार्षिक अहवालात अदानी म्हणाले की, "आम्हाला हे समजले पाहिजे, की कोणतीही कल्पना पूर्णपणे योग्य किंवा चुकीची असू शकत नाही. आज या संकटाच्या वेळी अशा सरकारची उपलब्ध माहितीच्या आधारे निर्णय घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर नवीन माहिती येताच आपण स्वत:ला जुळवून घेऊ शकतो. कोविड - 19 ने निर्माण केलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने चांगले काम केले" असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर अधिक संसाधने असलेल्या देशांना संघर्ष करावा लागला आहे. या विषाणूशी लढा अजून संपलेला नाही, परंतु असे म्हणायला मला अजिबात संकोच नाही की, हे निर्णय घेण्यास त्यांना उशीर झाला तर आज आपल्यासमोर एक मोठे संकट उभे ठाकले असते, ज्याचा परिणाम फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगावर होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
गौतम अदानी हे देशातील आघाडीचे उद्योग समूह असलेल्या अदानी समूहाचे प्रमुख आहेत. पायाभूत क्षेत्राशी संबंधित हा समूह बंदर ते वीज क्षेत्रापर्यंत कार्यरत आहे. अदानी म्हणाले की, या संकटाच्या वेळी देशातील नेते, डॉक्टर, आरोग्यसेवक, पोलीस, सैन्य आणि नागरिकांनी एकमेकांना ज्या प्रकारे सहकार्य केले ते कौतुकास्पद आहे.