ETV Bharat / briefs

नाशिक महानगरपालिकेला मिळणार 20 हजार रेमडेसिवीर

author img

By

Published : Apr 12, 2021, 4:36 PM IST

नाशिक शहरासाठी 20 हजार रेमडेसीवीर मिळणार आहेत.

Nashik
Nashik

नाशिक : रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या पुढाकाराने मायलन कंपनीशी थेट संपर्क करून 20 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यात यश मिळाले आहे. पहिल्या टप्यात 24 तासांत 5 हजार इंजेक्शनचा पुरवठा होणार आहे.

20 हजार रेमडेसिवीर मिळणार

नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर मिळावे ह्यासाठी नातेवाईकांना मेडिकल स्टोअर बाहेर ऊन्हातान्हात तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यासोबतच इंजेक्शन मिळत नाही म्हणून 10 एप्रिलला संताप व्यक्त करत नातेवाइकांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले. यानंतर महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या पुढाकाराने थेट मायलन कंपनीशी संपर्क साधण्यात आला. त्यानुसार, नाशिक शहरासाठी 20 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यश मिळवले आहे. येत्या 24 तासांत पहिल्या टप्यात 5 हजार इंजेक्शन महानगर पालिकेला उपलब्ध होणार आहे.

कोरोना रुग्णांना दिलासा

शहरात 20 हजार रेमडेसिवीर चार टप्यांत उपलब्ध होणार आहेत. रुग्णांना रेमडेसिवीर मिळणार असल्याने दिलासा मिळण्यास मदत होणार असल्याचे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी म्हटलं आहे.

खासगी रुग्णालयांचे काय?

नाशिक शहरात जेवढे कोरोना बाधित रुग्ण सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, तेवढेच रुग्ण आज खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. अशात पहिल्या टप्यात 5 हजार रेमडेसिवीर पालिका रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. मात्र खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची गरज लक्षात घेता त्यांचे एचआरसीटी अहवाल, ऑक्सिजन लेव्हल आदी बाबी तपासून त्या रुग्णांना देखील रेमडेसिवीर पालिकेने उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.