ETV Bharat / briefs

मुंबई पोलिसांकडून बनावट ई-पास प्रकरणी 4 आरोपींना अटक - Mumbai crime news

मुंबई पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अब्दुल करीम मोहमद शेख उर्फ अस्लम (वय-35) , समीर शमशुद्दीन शेख (वय-36) नूर मोहमद अब्दुल गणी शेख (वय-39) व विनय मोहन पार्टे (वय-36) यास वसई येथून अटक केली आहे.

Mumbai police
मुंबई पोलिसांकडून बनावट ई-पास प्रकरणी 4 आरोपींना अटक
author img

By

Published : Jul 26, 2020, 10:53 AM IST

मुंबई - कोरोना संक्रमण वाढू नये म्हणून, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी शासनाची योग्य परवानगी घेणे अत्यावश्यक असते. त्यासाठी ई-पासची सुविधा नागरिकांना करून देण्यात आली आहे. मात्र, कुठलेही वैध कागदपत्रे न सादर करता बनावट ई-पास बनवून ते समाज माध्यमांचा वापर करून गरजूंना देण्यात येत होते. बेकायदेशीर काम करणाऱ्या चार जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा (क्रमांक-3) ने अटक केली आहे.

मुंबई पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अब्दुल करीम मोहमद शेख उर्फ अस्लम (वय-35) , समीर शमशुद्दीन शेख (वय-36) नूर मोहमद अब्दुल गणी शेख (वय-39) व विनय मोहन पार्टे (वय-36) यास वसई येथून अटक केली आहे. यातील सिंधुदुर्ग येथील मालवण परिसरातून अटक करण्यात आलेले तीन आरोपी हे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात. वसई येथून अटक करण्यात आलेला आरोपी विनय पार्टे हा वसई परिसरात टायपिंग व कंप्युटर कोचिंग क्लासेस चालवीत आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास ची गरज भासत असताना टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारे आरोपी हे गरजू नागरिकांकडून पैसे घेऊन संगणकावर बनावट ई-पास बनवत होते. वसई येथून अटक करण्यात आलेला आरोपी हा मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट ई-पास बनवून पाठवत होता. या अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.