मुंबई - महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भाजप वॉर्ड क्रमांक ८ च्यावतीने नगरसेवक हरीश छेडा आणि कच्छ युवक संघ यांनी घेतलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले.
यावेळी पहिल्यांदा रक्तदान करणाऱ्या श्रुती दवे, माता-लेक अवनी आणि कुमारी ऐश्वर्या बांदेकरसह अनेक युवक, युवतींचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे आयोजित रक्तदान शिबिरात मालाड येथील एका परिवारातील चार बहिणींनी केलेल्या रक्तदानासाठी खासदार शेट्टी आणि सावरकर उद्यान पदाधिकारी यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.
कोरोना काळात अनेक अडचणी, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे औषधी, इंजेक्शनची कमतरता असल्याने रुग्ण आणि नातेवाईकांची धावपळ होत आहे. त्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या मतदार संघात भाजप आणि विविध सामाजिक संस्थांना ५००० रक्त पिशव्या संग्रह करण्यात यावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार, पाच एप्रिलला भाजपच्या स्थापना दिनाच्या पूर्व संध्येपासून आजपर्यंत 19 रक्तदान शिबिरात एकूण 2632 रक्त पिशव्यांचा संग्रह करण्यात आला आहे.
उत्तर मुंबईतील खासदार म्हणून गोपाळ शेट्टी यांच्या आवाहनाला महावीर जैन संघ, ब्रम्हाकुमारी, वागड समाज, दक्षिण भारतीय, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कच्छ युवक संघ, एमसीएफ, साई प्रबोधन ट्रस्ट, कोळी समाज, गवळी समाज, मुंबई ऑटोरिक्षा टेक्सी मेन्स युनियन आणि गणेश उत्सव मंडळ सारखे अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे.
1मेला एका दिवसात उत्तर मुंबईत आठ ठिकाणी गोपाळ शेट्टी यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन आणि पाहणी केली. सोबत उत्तर मुंबई भाजप अध्यक्ष गणेश खनकर, मुंबई सचिव विनोद शेलार, मनीषा चौधरी आदी. उपस्थित होते.
आज एकूण आठ ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरात 548 पिशव्या संग्रह करण्यात आला आहे. गोपाळ शेट्टी यांच्या आवाहनानंतर पाच एप्रिलला भाजपच्या स्थापना दिनाच्या पूर्व संध्येपासून आजपर्यंत 19 रक्तदान शिबिरात एकूण 2632 रक्त पिशव्यांचा संग्रह करण्यात आला आहे.