ETV Bharat / briefs

नागपुरात कुख्यात गुंड बाल्या वंजारीचा खून - nagpur crime news

बाल्या वंजारी हा परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याचे अनेकांशी वाद होते. आज (रविवारी) पारडी मार्गावरील आठवडी बाजार भरला असताना बाल्या त्याठिकाणी असल्याची माहिती समजताच आरोपी नरेंद्र मेहर याने बाल्याला गाठून त्याची निर्घृण हत्या केली.

nagpur crime news
most wanted balya wanjari murdered at nagpur
author img

By

Published : Jun 7, 2020, 9:34 PM IST

नागपुर - शहरातील पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य मार्गावर असलेल्या आठवडी बाजारात कुख्यात गुंड प्रदीप उर्फ बाल्या वंजारीची हत्या करण्यात आली आहे. बाल्याची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली आहे. मृत बाल्या वंजारी हा कुख्यात गुन्हेगार असून पोलिसांनी त्याला तडीपार केल्याची माहिती मिळाली आहे.

बाल्या वंजारी हा परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याचे अनेकांशी वाद होते. आज (रविवारी) पारडी मार्गावरील आठवडी बाजार भरला असताना बाल्या त्याठिकाणी असल्याची माहिती समजताच आरोपी नरेंद्र मेहर याने बाल्याला गाठून त्याची निर्घृण हत्या केली. सुमारे महिनाभरापूर्वी बाल्या आणि आरोपी नरेंद्र मेहर या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्याच वादाचे रूपांतर बाल्या वंजारीचा हत्येत झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, नागपूरात खुनाच्या घटनांचे सत्र अजूनही सुरूच आहे. गेल्या 11 दिवसांमध्ये नागपुर जिल्ह्यात खुनाच्या 11 घटना घडल्या आहेत. तर नागपूरात शहरात आठ जणांच्या हत्या झाल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.