नागपूर - जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत असतांना आज रुग्णसंख्येत घटही दिसून आली. तेच बाधिताच्या तुलनेत कोरोनामुक्त अधिक असल्याने सकारात्मक म्हणावा असाच काहीसा अहवाल पुढे आला आहे. सोमवारी आलेल्या अहवालात 5 हजार 852 हे नव्याने बाधित मिळून आले असले तरी 5921 जण हे कोरोनातून मुक्त झाले आहे.
नागपूर जिल्ह्यात सोमवारी 18 हजार 997 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरात 3660 तर ग्रामीण भागात 2182 नव्याने मिळून आले. त्याच तुलनेत शहरात 3772 तर ग्रामीणमध्ये 2149 जण कोरोनातून बरे झाले आहे. यामुळे सरसरीत घट आली असून 69 जण नविन बाधितांच्या तुलनेने कोरोनामुक्त अधिक झाले आहे. यात मृत्यूची संख्येत घट झाली नाही. यात शहरात 54, ग्रामीण 25 तर बाहेर जिल्ह्यातील 10 जणांची नोंद झाली आहे. आताच्या घडीला 77 हजार398 उपचार घेत असून यांची संख्या हळू हळू कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्याची स्थिती पाहता 10,332 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच 9,594 नवीन बधितांची भर पडली असली तरी 738 हे अधिकचे कोरोनातून बरे झाले आहे. यात मृत्यूची संख्या अद्याप घटली नसून सोमवारी आलेल्या अहवालात 154 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
नागपूर - 5852
भंडारा - 772
चंद्रपूर - 1529
गोंदिया 601
वर्धा - 501
गडचिरोली - 379
दिलासा! नागपुरात बाधितांच्या तुलनेत बरे झालेले रुग्ण अधिक - Nagpur corona death on 26th April 2021
नागपूर जिल्ह्यात सोमवारी 18 हजार 997 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरात 3660 तर ग्रामीण भागात 2182 नव्याने मिळून आले.